मंडळी आपल्यापैकी बरेच जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, आणि ट्विटर ही माध्यमे तर जगप्रसिद्ध आहेत. असो तर जगातील महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, संघटना, या सगळ्यांचे अकाऊंट्स हे ट्विटरवर असतातच. एखादी महत्त्वाची घोषणा असुदे किंवा अति महत्त्वाची घटना यांचे अपडेट्स हे आपल्याला ट्विटरवरच मिळतात. तर अशा या ट्विटरला वापर अनेक मोठमोठे सेलिब्रिटी, आपल्या देशातील राजकीय सलिब्रिटी, खेळाडू, पत्रकार हे सगळे दररोज काही ना काही ट्विट करत असतात. आता आपल्या बिग बींचं उदाहरण घ्या. एखाद्या तरुणालाही लाजवेल इतके ते ट्विटरवर ऍक्टिव्ह असतात. परंतु आपल्याला ठाऊक आहे का की अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर ट्विट करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. नेमकी काय पद्धत आहे आपण आज जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच खूप अॅक्टिव असतात. ते ट्विटरवर चाहत्यांशी जोडले गेले आहेत. त्यांचे ट्विटरवर ४४.९ फॉलोअर्स आहेत. परंतु, त्यांच्या ट्विट्समध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की ते त्यांच्या प्रत्येक ट्विटला नंबर देतात. अमिताभ अनेकदा ट्विट नंबरमध्ये दुरुस्त्या देखील करतात. त्यांची ट्वीट संख्या मोजण्याचं एक खास कारण आहे.
T 3767 – Manmohan Desai the Great felt I should do a remix of MJ .. in our film 'Ganga Jamuna Saraswati' .. the result was horrendous !
An utter disaster ???????????? pic.twitter.com/7vFRCLmdkO— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 29, 2020
अमिताभ बच्चन त्यांच्या ट्विटसह नंबर लिहायला कधीच विसरत नाहीत. बर्याच वेळा, जेव्हा ही संख्या चुकीची असते तेव्हा ते त्यांची दुरुस्ती देखील पोस्ट करतात. बर्याचदा लोक याची खिल्लीही उडवतात. बिग बी असं का करतात असा प्रश्न फक्त सामान्य लोकच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही आहे. शाहरुख खानने एकदा कुतूहलापोटी बिगबींना याबद्दल विचारलंच होतं.
T 3768 – … tomorrow dawns .. and the celebrations begin .. but for what .. its just another day another year .. big deal !
Better off making music with the family .. pic.twitter.com/6Tt9uVufbp— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 30, 2020
‘बदला’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहरुखने बिग बींना प्रत्येक ट्विटसह नंबर लिहिण्याचे कारण विचारलं. यावर, अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं की जर त्यांना काही जुनी गोष्ट काढायची असेल तर ते त्या नंबरचा संदर्भ म्हणून वापर करतात, ज्यामुळे ती बाब मिळणं सुलभ होतं. ही आणखीन एक चांगली आणि जुनीच गोष्ट खरं तर परंतु या माध्यमांवर बिग बींमुळे पुन्हा एकदा शिकायला मिळाली. बिग बींचा लेटेस्ट ट्वीट नंबर ३७६८ आहे आणि यात त्यांनी एक सुंदर श्लोक सांगितला आहे आणि सोबतच त्याचा अर्थ देखील! आहे कि नाही भारी बिग बींच्या या ट्विट्स वरील नंबर्स मागची कथा!