Saturday, June 29, 2024

करियरच्या टॉपवर घेतलेले लग्नाचा निर्णय आणि अमेरिकेतील जीवनशैली, अश्विनी भावे यांनी सांगितला त्यांचा हा प्रवास

अश्विनी भावे काय आणि किती बोलावे या अभिनेत्रीबद्दल. त्यांचे नाव उच्चारले की डोक्यात आधी लिंबू कलरची साडीच येते असो. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अतिशय सुंदर, शांत अशा अश्विनी भावे यांचा आज सिनेसृष्टीमधे वावर कमी झाला असला तरी त्या विविध शोमध्ये, सोशल मीडियावर सतत त्याच्या चाहत्यांना भेटत असतात.

अश्विनी यांनी त्यांच्या करियरमध्ये अगदी सोशिक सुनेपासून मॉडर्न सुनेपर्यंत अशा अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये तर त्यांचे खूपच वेगळे आणि आश्चर्यचकित करणारे रूप आणि भूमिका दिसल्या. मराठीमध्ये टॉपवर असताना आणि हिंदीमध्ये देखील चांगले काम करणाऱ्या अश्विनी यांनी अचानक अभिनयातून ब्रेक घेते आणि असलेले स्टारडम मागे सोडत अमेरिकेत सेटल होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का तर बसला सोबतच सर्वांची निराशा देखील झाली.

अभिनयाचे करियर अतिशय सर्वोत्कृष्ट चालू असताना अश्विनी यांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि भारत सोडून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्या अय निर्णयावर एकदा अश्विनी यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले होते त्या म्हणाल्या, ” भारतातून अमेरिकेत जाऊन तिकडे सेटल होणे हे वाटते तितके सोपे कधीच नव्हते. ते माझ्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरले. लग्नाआधीचे माझे जीवन सोडून लग्न करत नवीन आयुष्यात प्रवेश हीच बाब खूप अवघड होती. मात्र लग्न करण्याचा निर्णय मी घेतला होता. पूर्ण विचार करून मी हे ठरवले आणि मुख्य म्हणजे मी जे ठरवते ते करते.”

पुढे अश्विनी म्हणाल्या, “मी माझे करियर यशस्वी केले. मला संसार देखील करायचा होता. हे माझे स्वप्न होते. मी लग्न केले आणि संसार सुरु झाला. इथे देखील मला यश मिळाले आहे. माझ्या लग्नाला २६ वर्षं पूर्ण झाली. भारतातून अमेरिकेत गेल्यानंतर मला अनेक वेगळे अनुभव आले. सांस्कृतिकदृष्ट्या मला तिथे एक वेगळा अनुभव मिळाला. मी सामान्य कुटुंबातून येते. माझा जन्म चाळीत झाला. अगदी नवीन फ्रॉक आणला तरी मी सगळ्या चाळीतील घरांमध्ये जाऊन नमस्कार करायचे. मात्र सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मला ‘शेजार’मध्ये एक अलिप्तपणा जाणवला. मात्र हाच त्या संस्कृतीचा भाग आहे हे मला जाणवले. तिथे राहताना मला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. त्या करताना भारत किती समृद्ध आहे, हे मला जाणवले.”

प्रसिद्धीबद्दल बोलताना अश्विनी म्हणाल्या, “भारतातील करिअर सोडून अमेरिकेत गेल्यावर मला ओळख नव्हती. त्यामुळे मी तिथे प्रसिद्धीच्या झोतात आली नाही. मात्र याबद्दल मला कधीच खंत वाटली नाही. उलट हेच मला जास्त आवडले. नवीन काहीतरी शिकण्याच्या विचाराने, मी अमेरिकेत गेल्यावर फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मी काही नवीन शिकू शकले. आता माझे एक समीकरण तयार आहे की मी भारतात आले की काम करते आणि अमेरिकेत असते तेव्हा संसार करते. माझी मुलं आता महाविद्यालयात गेली. त्यामुळे आता मला माझ्यासाठी वेळ देता येतो.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

हे देखील वाचा