भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने खूप नुकसान केले. ही लाट खूप वेगाने पसरली. अशातच अशी बातमी आली होती की, बप्पी लहरी यांना कोरोना झाला होता. परंतु उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. त्यांचे मुंबईमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे संगीतावर किती प्रेम होते हे सगळ्यांना माहीतच आहे यासोबत आणखी एक गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की, बप्पींना सोन्याची देखील खूप आवड होती. त्यांना सोने घालण्याची खूप आवड होती.
बॉलिवूडमध्ये ‘डिस्को किंग’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या बप्पी (bappi lahiri) यांचे खरे नाव अलोकेश लहिरी हे होते. २०१४ मध्ये बप्पी यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या सोने चांदीची माहिती दिली होती. ते मोठमोठ्या सोन्याच्या चैनी वापरत असत. त्यांच्याजवळ जेवढे सोने होते त्यापेक्षा जास्त सोने त्यांची पत्नी चित्रानी जवळ होते. (Why does bappi Lahiri wear so much gold, know their weight and price)
बप्पी लहरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान बीजेपीकडून श्रीरामपूरमधून लोकसभा लढवली होती. यावेळी त्यांच्या संपत्तीबद्दल सांगताना त्यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे. ही माहिती त्यांनी २०१४ मध्ये दिली होती. आता या गोष्टीला जवळपास ७ वर्ष झाले आहेत. आता यात खूप मोठा बदल झाला आहे. त्यांच्याकडे एकूण २० कोटी एवढी संपत्ती आहे.
बप्पीदा यांना सोन्याची खूप आवड होती यात काहीच शंका नाही. त्यामुळेच त्यांना जेव्हा पाहू तेव्हा सोन्याने भरलेले दिसायचे. परंतु असे नाही की, त्यांच्या कुटुंबात सोन्याची इतर कोणाला आवड नव्हती. त्यांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम एवढे सोने आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे ४.६२ किलो चांदी आहे. त्यांच्या पत्नीकडे ८.९ कोटी चांदी आहे. तिच्याकडे ४ लाख रुपयांचे हिरे देखील आहे.
बप्पी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेसलीकडून खूप प्रभावित झाले होते. ते देखील नेहमी त्यांच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चैन घालत असे. तेव्हा बप्पी विचार करत होते की, ते जेव्हा यशस्वी होतील तेव्हा ते देखील त्यांच्याप्रमाणे सोने घालतील. त्यामुळे ते प्रेसलीकडून प्रभावित होऊन एवढे सोने घालत होते.
बप्पी लहरी यांच्याकडे २०१४ मध्ये जेवढे सोने होते त्याची आज ३५ लाख १९६ रुपये एवढी किंमत आहे. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या चांदीची किंमत २ लाख ७५ हजार एवढी आहे.
हेही वाचा :