Saturday, October 18, 2025
Home अन्य करीना कपूर खान तिचा कोणताही चित्रपट का पाहत नाही? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले कारण

करीना कपूर खान तिचा कोणताही चित्रपट का पाहत नाही? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले कारण

करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करण 8 च्या आगामी भागात करीना कपूर खान आणि आलिया भट्ट सहभागी होणार आहेत. या एपिसोडचे प्रोमो नुकतेच रिलीज झाले आहेत. या प्रोमोमध्ये करीना कपूर खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ती तिचा कोणताही चित्रपट पाहत नाही.

करीना कपूर खान (Kareena Kapoor) म्हणते की, “जेव्हाही मी स्वतःला चित्रपटात पाहते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटते. मी माझा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही. मला असे वाटते की मी अशा ठिकाणी आहे जिथे मी खूप आनंदी आहे, खूप शांत आहे, खूप मी तणावमुक्त आहे आणि सर्वकाही चांगले चालले आहे. अशा परिस्थितीत, मला असे वाटते की मी स्वतःकडे पाहिले तर मी स्वतःला न्याय देऊ लागेन.”

करीना कपूर खानचे हे बोलणे ऐकून आलिया भट्ट एकदम चकित झाली. तिने करीना कपूर खानला सांगितले की, “तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे.”या एपिसोडमध्ये करीना कपूर खानने आलिया भट्टलाही एक मजेशीर सल्ला दिला आहे. आलिया भट्टने सांगितले की, “तिच्या आणि रणबीर कपूरमध्ये राहाबाबत अनेक भांडणे होतात. राहासोबत कोण जास्त वेळ घालवते यावर आम्ही दोघे भांडतो.” यावर करीना कपूर खानने दोघांमधील भांडण संपवण्याचा सल्ला दिला आहे. तिने सांगितले की, “हे दुसरे मूल होण्याचे लक्षण असल्याचे करीनाचे म्हणणे आहे. जेणेकरून दोघांनाही एक असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 करीना कपूर खान आणि आलिया भट्ट या दोघीही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची मैत्रीही चांगली आहे. या एपिसोडमध्ये या दोघी एकमेकांशी अनेक मजेशीर गोष्टी बोलताना दिसणार आहेत. हा एपिसोड 23 जुलै रोजी प्रसारित होणार आहे.

आधिक वाचा-
ना अभिनेता, ना क्रिकेटर…मृणाल ‘या’ घटस्फोटित रॅपर आणि गायकाला करते डेट? व्हिडिओ व्हायरल
करीना कपूर खान तिचा कोणताही चित्रपट का पाहत नाही? खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले कारण

हे देखील वाचा