Tuesday, July 9, 2024

KKK 12 | दरवर्षी ‘खतरों के खिलाडी’ का होस्ट करतो रोहित शेट्टी? दिग्दर्शकाने केला ‘हा’ खुलासा

टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चा सीझन १२ सुरू झाला आहे. हा शो बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) होस्ट करत आहे. टीव्हीची हॉट अभिनेत्री रुबिना दिलैकही (Rubina Dilaik) या शोमध्ये स्पर्धक आहे. नुकताच रुबिनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रोहित शेट्टीला प्रश्न विचारताना दिसत आहे. यामध्ये रुबिनाने दिग्दर्शकाला दरवर्षी शो होस्ट करण्याचे कारण विचारले.

अभिनेत्री प्रथम पहिल्यांदा रोहित शेट्टीला म्हणाली, की “आज मला तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली आहे आणि मी ही संधी मी जाऊन देणार नाही. तुम्ही उत्तर द्या आणि तुम्हाला कोणताही प्रश्न चुकीचा वाटला, तर इथेच मला ओरडा.” यावर रोहित हसला. (why rohit shetty host khatron ke khiladi every year)

मग रुबीनाने प्रथम रोहितला प्रश्न विचारला, “सर, या शोमध्ये असे काय आहे की, तुम्ही दरवर्षी हा शो का होस्ट करता?” यावर रोहित म्हणतो की, “मला या शोचा जॉनर आवडतो. मी हेच करतो. बाकीच्या जॉनरमध्ये मला इतकी आवड नाही. इतरांनाही हा शो खूप आवडतो, त्यामुळे मी त्याकडे आकर्षित झालो आहे.”

त्यानंतर रुबिना विचारते की, “शोच्या सेटवर कोणत्या दोन गोष्टी नेहमी एकत्र ठेवाव्यात?” याला प्रत्युत्तर देताना रोहित म्हणतो, “फियर फंदा आणि इतर कोणत्याही खेळाडूला चुकूनही दुखापत होऊ नये याची काळजी.” तसेच पुढील उत्तरात तो सांगतो की, घराबाहेर असल्यावर तो भारतीय जेवण मिस करतो. त्याचबरोबर ‘खतरों के खिलाडी’ शोची टीम कुटुंबासारखी मानतो.

रुबिनानेही रोहितच्या भीतीबद्दल विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात रोहित म्हणाला की, “कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये, हे माझे सर्वात मोठे भय आहे. रुबिनाच्या पुढील प्रश्नावर, रोहितने खतरों के खिलाडीचे आवडते ठिकाण केपटाऊन सांगितले. त्याचवेळी रुबिनाने शेवटचा प्रश्न ‘खतरों के खिलाडी’मधील रोहितचा आतापर्यंतचा आवडता स्पर्धक विचारला. प्रत्युत्तरात रोहितने रुबीनाचे नाव घेतले.

दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगलात या शोचे शूटिंग सुरू आहे. या शोमध्ये रुबिना दिलैक, सृती झा, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अडातिया, तुषार कालिया, एरिका पॅकार्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी यांच्यासह १५ स्पर्धक आहेत. सोशल मीडिया स्टार्स मिस्टर फैजू आणि जन्नत जुबेर यांचीही जोडी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा