सिनेसृष्टीतील कलाकारांचं कधी कोणासोबत नातं जोडलं जाईल आणि कधी तुटेल, काही सांगता येत नाही. मात्र, जेव्हा जोडपे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसतो. कदाचित असाच धक्का पाकिस्तानी अभिनेत्याच्या चाहत्यांनाही बसला असेल. पाकिस्तानी अभिनेता फिरोज खान याच्याबद्दल वाईट बातमी समोर येत आहे. तो लवकरच पत्नी अलीजे सुलतान हिच्यापासून वेगळा होणार आहे. दोघेही त्यांचे 4 वर्षांचे नाते संपवत आहेत. अशातच अभिनेत्यावर एक्स पत्नीने गंभीर आरोप लावले आहेत. यामुळे त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. चला तर संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…
झाले असे की, अलीजे सुलतान (Alizey Sultan) हिने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट समोर येताच, अभिनेता फिरोज खान (Feroze Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अलीजेने अभिनेत्यावर शारीरिक अत्या’चाराचा आरोप लावत दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आमचा चार वर्षांचा संसार पूर्णपणे व्यवस्थित नव्हता. यादरम्यान मला सतत शारीरिक आणि मानसिक हिंसा सोसावी लागली. तसेच, पतीकडून धोका, ब्लॅकमेल आणि अपमान सहन करावा लागला.”
अलीजेने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “खूप विचार केल्यानंतर मी या दु:खद निर्णयावर आले की, मी माझे संपूर्ण जीव या भयानक पद्धतीने घालवू शकत नाही. माझ्या मुलांचे भविष्य लक्षात घेता मी हा निर्णय घेतला आहे. त्याने एका हिंसक वातावरणात राहावे असे मला वाटत नाही. मला भीती आहे की, अशा वातावरणात राहिल्याने त्याच्या मानसिक विकास आणि आयुष्यावर परिणाम होईल.”
View this post on Instagram
अभिनेत्याच्या एक्स पत्नीने हे खुलासे केल्यानंतर तो जोरात ट्रोल होत आहे. तसेच, अनेकजण त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच या आरोपांवर अभिनेत्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “त्याला पाकिस्तानच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.” पुढे त्याने असेही सांगितले की, त्यांचा घटस्फोट 3 सप्टेंबर, 2022 रोजी होणार होता. यानंतर त्याने कौटुंबिक न्यायालयात गुन्हा दाखल करून आपल्या मुलाची कस्टडी आणि त्याला भेटण्याच्या अधिकाराची मागणी केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’
म्हणून प्रसिद्ध अभिनेत्यावर आली ‘बिग बॉस’मध्ये काम करण्याची वेळ; म्हणाला, ‘इतके सिनेमे देऊनही…’