चित्रपट निर्माती आणि लेखिका असलेल्या ताहिरा कश्यपने शनिवारी (२१ ऑगस्ट) एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, तिला तिचा पती अभिनेता आयुष्मान खुरानाची खूप आठवण येत आहे. यासह तिने एक मोनोक्रोम नो- फिल्टर सेल्फी देखील शेअर केला आहे. या फोटोला तिने साल २०१५ मध्ये आलेला ‘हवाईजादा’ या चित्रपटामधील ‘दिल-ए-नदान’ हे गाणं लावलं आहे. त्याचबरोबर हे गाणं स्वतःहा आयुष्मान खुरानाने गायले आहे.
ताहिरा कश्यपने ही पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “मी आयुष्मानला खूप मिस करत आहे, मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही एकमेकांना भेटून दोन महिने झाले. आता थोडं वेगळं वाटत आहे. बहुतेक मी नंतर करू शकत नाही. पाऊस सुद्धा मदत करत नाही.”
पत्नी ताहिरा कश्यपच्या या पोस्टवर आयुष्मान खुरानाने कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, “अजून फक्त दोन आठवडे आणि उम्म.” त्याने आपल्या कमेंटमध्ये हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. आयुष्मानलाही ताहिराची ही पोस्ट खूप आवडली आहे. आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाची पत्नी आकृती आहुजा हिनेही ताहिराच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने दुःखी चेहऱ्याचे आणि हृदयाचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. यावर ताहिराने उत्तर दिले, “मला माहित आहे.”
आयुष्मान खुराना सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये त्याच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अनुभूती कश्यप या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात शेफाली शाह आणि रकुल प्रीत सिंग या अभिनेत्री देखील आपली भूमिका साकारणार आहेत. ‘डॉक्टर जी’ व्यतिरिक्त आयुष्मानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘अनेक’ या चित्रपटांचाही समावेश आहे. (I miss you so much today! Saying Ayushman’s wife posted a photo)
दरम्यान, ताहिरा कश्यप तिचा पहिला चित्रपट ‘शर्माजी की बेटी’ दिग्दर्शित करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात साक्षी तन्वर, दिव्या दत्ता आणि सैयामी खेर प्रमुख अभिनेत्री असणार आहेत. ताहिराने या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे आणि ती तिच्यासाठी खूप खास आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘डोळे त्या गोष्टी सांगतात, ज्या गोष्टी सांगायला ओठ घाबरतात…’, म्हणत साराने बिकिनीतील फोटो केले शेअर
-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट