Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारची चाहत्यांना दिवाळी भेट, बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

अक्षय कुमारची चाहत्यांना दिवाळी भेट, बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली वर्षभर बंद असलेली चित्रपटगृह उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या घोषणेमुळे हिंदी सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. सिनेमागृह सुरू करण्याची घोषणा होताच बॉलिवूड दिग्दर्शकांनी रखडलेले चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी केली आहे. सर्वांनी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्याचा धडाका लावला आहे.

यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव आघाडीला आहे. चित्रपटगृह उघडताच रोहित शेट्टीने सर्वप्रथम त्याचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. चित्रपट प्रदर्शनाची निश्चित तारीख समोर आली नसून, चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे. (will akshay kumar and katrina kaif starrer sooryavanshi release on 5th november)

चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावरुन त्याचा सुपर ऍक्शन चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, अक्षय कुमार, कॅटरिना कैफची भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मात्र अशी कोणतीही तारीख अजून जाहीर केली गेलेली नाही.

जाणकारांच्या माहितीनुसार, पूर्वी असा नियम होता की, दिवाळीमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट दिवाळीच्या पहिल्या दिवशीच प्रदर्शित केला जाईल. परंतु सणाच्या धामधुमीत आणि तयारीमध्ये पहिल्या दिवशी चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, दुसर्‍या दिवशी सुट्टी असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतात ज्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विक्रम बनवण्यात चित्रपट यशस्वी होतो. यापूर्वी ‘हॅप्पी न्यू ईयर’ , ‘गोलमाल अगेन’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपट दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी प्रदर्शित झाले होते.

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफची भूमिका असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे धडकलण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट २२ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली वर्षभर सतत प्रदर्शनाची तारीख पुढे पुढे ढकलण्यात येत होती. आता मात्र दुसर्‍या लाटेनंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे, ज्याची निर्माता रोहित शेट्टी दीर्घकाळ वाट बघत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा