Wednesday, July 3, 2024

‘पंगा क्वीन’ कंगना रणौत ठेवणार राजकारणात पाऊल? जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री

अभिनेत्री कंगना रणौतने सिनेजगतात बरीच मजल मारली आहे. ती गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर प्रत्येक चित्रपटात तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. असाच एक नवाकोरा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कंगना रणौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगनाने दिवंगत ज्येष्ठ राजकारणी जे.जयललिता यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर देश, जग किंवा मनोरंजन विश्वाशी संबंधित कोणताही मुद्दा असो, अभिनेत्री अतिशय स्पष्टपणे आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. याच कारणामुळे ती अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती.

सर्व काही जनतेच्या हातात
पण जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणारी कंगना रणौत राजकीय जगात पाऊल टाकेल का? माध्यमांतील वृत्तानुसार, कंगनाने एका पत्रकार परिषदेत याबद्दल वक्तव्य केले आहे. कंगना स्पष्टपणे म्हणाली की, पूर्णपणे जनतेच्या हातात आहे. ती म्हणाली की, “मी नेता होऊ शकते की नाही हे माझ्या हातात नाही. लोकांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही पंचायत निवडणुकाही घेऊ शकत नाही.”

जनतेशिवाय काहीही नाही
कंगना रणौत पुढे म्हणाली की, “मी जर राजकारणात पाऊल ठेवलेच, तर त्यामागचे कारण म्हणजे जनता असेल किंवा मग माझ्याकडे ती क्षमता असेल. मी एक राष्ट्रवादी आहे आणि मी देशाशी संबंधित मुद्द्यांवर बोलते. हेच कारण आहे की, लोकांना असे वाटते की मी राजकीय विषयांवर बोलतो. कदाचित तीच गोष्ट असेल, पण माझ्यासाठी असे नाही कारण मी नेता नाही. मी एक जबाबदार नागरिक आहे.”

थलायवीचे दिले उदाहरण
अभिनेत्री कंगना रणौतने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपट स्वतःहून सुपरहिट केले आहेत. तिच्या शेवटच्या काही चित्रपटांमध्ये, मुख्य अभिनेत्रीचे वजन मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. कंगना म्हणाली की, “जयललिता यांच्याबद्दल कोणीही विचार केला नव्हता की, त्या कधीही राजकारणी बनतील. परंतु त्यांनी फक्त राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले नाही, तर त्यांनी स्वतःला सिद्ध देखील केले.”

त्याचबरोबर आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा