Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉस १६’ होस्ट नाही करणार सलमान खान? निर्मात्यांसमोर ठेवली मोठी अट

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय रियॅलिटी शो आहे, ज्याचे १५ सीझन पूर्ण झाले आहेत. ‘बिग बॉस’ सुरू होण्याआधी प्रत्येक वेळी सलमान खान (Salman Khan) आगामी सीझन होस्ट करणार का? असा प्रश्न पडतो. मात्र आता हा प्रश्न १६वा सीझन येण्यापूर्वीच सुरू झाला आहे. ‘बिग बॉस १५’च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानला विचारण्यात आले की, तो १६वा सीझन होस्ट करणार का? खरं तर, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य कारवा यांनी ‘बिग बॉस १५’च्या ग्रँड फिनालेमध्ये उपस्थिती दर्शवली. यादरम्यानच दीपिकाने सलमानला ‘बिग बॉस १६’शी संबंधित प्रश्न विचारला.

शोमधील एका गेमदरम्यान, दीपिका पदुकोणने सलमान खानला विचारले की तो आगामी सीझन होस्ट करणार आहे का? पण सलमान खानने दिलेले उत्तर, त्याचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. दीपिकाच्या प्रश्नाला उत्तर देताना सलमान खानने एक अट घातली आणि त्यानंतरच तो पुढच्या सीझनमध्ये दिसणार असल्याचे सांगितले. (will salman khan not host bigg boss season 16 the actor told his condition in the grand finale)

‘बिग बॉस १५’च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘गहराइयां’ची टीम त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यादरम्यान दीपिका पदुकोणने सलमान खानला विचारले की, तो शोचा पुढचा सीझन होस्ट करणार का? यादरम्यान सलमान खानने दीपिकासमोर एक अट ठेवली आणि सांगितले की जेव्हा निर्माते त्याचे पेमेंट वाढवतील तेव्हाच तो पुढचा सीझन होस्ट करेल. यावर दीपिका सलमान खानसोबत मस्करी करताना दिसते.

मग दीपिका सलमान खानला म्हणते की, “तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही पुढचा सीझन होस्ट करा किंवा सिद्धार्थ चतुर्वेदीला किस करा.” यावर सलमान म्हणतो की तो कमी पैशात बिग बॉस होस्ट करण्यास तयार आहे. इतकेच काय, तर तो विनामूल्य देखील होस्ट करेल. पण सिद्धार्थला किस करणार नाही. यादरम्यान सिद्धार्थ सलमान खानच्या हातावर किस करण्यासाठी पुढे येतो, पण सलमान त्यांना मजेत नकार देतो.

सलमान खान अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ होस्ट करत आहे. पण जेव्हा जेव्हा बिग बॉसचा नवा सीझन सुरू होतो, तेव्हा सलमान खानशी संबंधित बातम्या येऊ लागतात. प्रत्येक रिपोर्टमध्ये सलमान खानच्या बिग बॉसच्या फीबद्दल दावा केला जातो. जेव्हा सीझन १५ सुरू झाला तेव्हा दावा करण्यात आला होता की, या सीझनसाठी सलमान खानने ३५० कोटी रुपये घेतले आहेत.

हेही वाचा :

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

हे देखील वाचा