बॉलीवूड अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट शो होस्ट गौरव कपूर या जोडप्याने उघडपणे त्यांचे प्रेम जाहीर केले आणि आता लग्नाच्या अफवा सुरू झाल्या आहेत. अनेक चित्रपट नायिकांनी क्रिकेटपटूंना आपले जीवनसाथी म्हणून निवडले आहे. आता, आणखी एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीची क्रिकेट होस्टसोबतची प्रेमकहाणी पुर्ण कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिनेत्री कृतिका कामरा (Kritika Kamra)आणि भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट होस्ट गौरव कपूर यांच्या लग्नाबाबत असे वृत्त आहे की दोघे लवकरच लग्न करणार आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली. काही वृत्तानुसार, “कृतिका आणि गौरव एकत्र आनंदी जीवन जगत आहेत आणि त्यांचे नाते पुढील स्तरावर नेण्यास तयार आहेत. ते मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत.” वृत्तानुसार, हे जोडपे त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत मुंबईत लग्न करण्याचा विचार करत आहे. कृतिका आणि गौरव अजूनही लग्नाच्या तयारीला अंतिम रूप देत आहेत. या वृत्तांना अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नसली तरी, चाहत्यांना आशा आहे की हे दोघे लवकरच लग्न करतील.
गौरव कपूर एक क्रिकेट होस्ट आहे आणि तो अभिनय जगातही सक्रिय आहे. कृतिका कामरा आणि गौरव कपूरची प्रेमकहाणी काही काळापूर्वी सुरू झाली. ते अनेक महिन्यांपासून डेटिंग करत आहेत. गेल्या वर्षी १० डिसेंबर २०२५ रोजी कृतिकाने त्यांच्या नात्याची पुष्टी केली. कृतिकाने गौरवसोबतचे काही फोटो शेअर करून याची पुष्टी केली. त्यानंतर, तिने एका मुलाखतीत गौरवला डेट करत असल्याचेही कबूल केले. आता हे दोघे लवकरच लग्न करणार का हे पाहायचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आकांक्षा चमोला का ट्रोल होत आहे? या वादावर अभिनेत्रीचं थेट उत्तर










