Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये एनसीबीचे होणार सर्च ऑपरेशन? जाणून घ्या यामागील सत्य

शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये एनसीबीचे होणार सर्च ऑपरेशन? जाणून घ्या यामागील सत्य

 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना एनसीबीने अटक केल्यापासून या प्रकरणात सातत्याने विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. याआधी एनसीबीने बंदी घातलेल्या अंमली पदार्थांच्या जप्तीसंदर्भात सोमवारी (३ ऑक्टोबर) सकाळी मुंबईत शिपचा शोध घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या घरी देखील शोधमोहीम सुरू आहे. यामुळेच मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यामध्येही सर्च ऑपरेशन करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, शाहरुखच्या घरावर शोधमोहीम राबवली जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

एनसीबीने अटक केलेले सर्व आरोपी वेगवेगळ्या ग्रुपने शिपवर गेले होते. जेव्हा ते अंमली पदार्थाचे सेवन करत होते, यावेळी त्यांना छापा पडल्याची माहिती मिळाली आणि ते फरार झाले. या प्रकरणात सातत्याने छापे टाकले जात आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात आणखी अनेक लोकांना अटक होऊ शकते.

Photo Courtesy Instagram aryan

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा सर्वात जवळचा मित्र असलेला अरबाज मर्चंट जिथून अंमली पदार्थ आणायचा, त्याची एनसीबीला माहिती मिळाली आहे. एनसीबीने आतापर्यंत ८ लोकांना क्रूझमधून ताब्यात घेतले असून, रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनने एनसीबीच्या मेसचे जेवण केले. त्याला बाहेरचे जेवण पुरवले गेले नाही.

अटक आरोपींमध्ये मुनमुन धामेचा देखील समावेश असून, मुनमुन ही दिल्लीतील सर्वोत्तम मॉडेल आहे. जिने एका मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंगसुद्धा केले होते. या छाप्यामध्ये ती चरस खात असताना अटक केली गेली. अटक केलेला इश्मित चड्ढा हा दिल्लीचा मोठा उद्योगपती आहे. मोहक जयस्वाल यांचाही दिल्लीत मोठा व्यवसाय आहे.

यांच्यासोबतच अटक करण्यात आलेला गोमीत चोप्रा हा सुद्धा सुप्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट असून, तो दिल्लीच्या योजना विहारचा रहिवासी आहे. गोमीतच्या आईनेही काल आपल्या मुलाची मुंबई एनसीपी कार्यालयात भेट घेतली. आरोपी विक्रांत दिल्लीतील एका खासगी कंपनीत प्रॉडक्टिव्हिटी हेड म्हणून काम करतो. दुसरीकडे, आरोपी सजीता नुपूर ही दिल्लीची व्यापारी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा