मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. याप्रमाणे विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रिया प्रकाशला देखील तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे आवडते. त्याचबरोबर ती तिच्या स्टाईलमुळे देखील नेहमीच चर्चेचा विषय बनते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच तिने नवीन सुंदर फोटोशूट केला आहे. जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आजकाल प्रिया तिचे बरेच फोटोशूट करत आहे. ताज्या फोटोंमध्ये प्रिया खूपच बदललेली दिसत आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा डीप नेक ब्लाउज आणि साडी परिधान केली आहे. रेट्रोमध्ये युनिक दिसण्यासाठी प्रियाने कानातल्या ऐवजी तिच्या गळ्यात हेवी नेकलेस घातला आणि कानात गुलाब घातले आहे. गुलाबी गुलाब प्रियाच्या रेट्रो लूकमध्ये सौंदर्य वाढवत आहे.
एका फोटोमध्ये प्रियाने तिच्या मानेजवळील टॅटू फ्लॉन्ट केला आहे. प्रिया तिच्या या फोटोंनी लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे. या नवीन फोटोशूटने प्रियाच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. दुसऱ्या फोटोत प्रिया लाल रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात आणखीनच अप्रतिम दिसत आहे. या फोटोमध्ये प्रिया अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर राडा घातला आहे. चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड प्रेम वर प्रतिसाद देत आहेत.
प्रिया प्रकाश वारियर ‘अशी’ झाली प्रसिद्ध
प्रिया प्रकाश वारियरचा २०१९ मध्ये ‘ओरू अदार लव्ह’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हा ती चर्चेत आली होती. यामध्ये प्रिया प्रकाशच्या डोळ्याच्या हावभावाच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली होती. या कारणास्तव ती २०१८ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी व्यक्तिमत्त्व बनली. प्रिया प्रकाश वारियर ही मूळची केरळमधील त्रिशूरची आहे. तिचे वडील सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंटमध्ये काम करतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे