Wednesday, July 3, 2024

संगीतविश्वावर शोककळा, वर्षभरात संगीत जगताने गमावले ‘हे’ जादूई आवाज

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांच्या निधनाने संपूर्ण संगीत जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या जादूई आवाजाने त्यांनी अनेक दशके हिंदी संगीत जगतात अधिराज्य गाजवले होते. कोलकत्तामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने गायक केके यांचे दुखःद निधन झाले. अवघ्या वर्षभरात संगीत जगताने आणखी एक अनमोल आवाज गमावला आहे. पाहूया याआधी कोणत्या कलाकारांनी जगाचा निरोप घेत सर्वांना दुःखद धक्का दिला. 

लता मंगेशकर – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण सिने जगतावर शोककळा पसरली होती. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला होता. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी ब्रिच  कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

बप्पी लहिरी – लता मंगेशकर यांच्या निधनाने शोक सागरात बुडालेल्या सिने जगताला अवघ्या आठ दिवसातच बप्पी लहिरी यांच्या निधनाने दुसरा धक्का दिला. १५ फेब्रुवारी २०२२ ला बप्पी लहिरी यांचे दुखःद निधन झाले. बप्पी दा जवळपास महिनभर रुग्णालयात दाखल होते. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डिस्को किंग म्हणून त्यांची जगभरात ओळख होती. भारतीय संगीत जगताला त्यांनी डिस्को गाण्यांची आवड निर्माण करुन दिली.

सिद्धु मूसावाला – चार दिवसांपूर्वीच रविवारी २९ मे रोजी पंजाबच्या मानसामध्ये प्रसिद्ध गायक सिद्धु मूसावाला यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी तरुण गायकाला अशा प्रकारे जीव गमावावा लागल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली होती.

हेही वाचा- 

सम्राट पृथ्वीराज | ‘या’ देशांमध्ये बॅन करण्यात आलाय अक्षय कुमारचा चित्रपट, पण का?

‘मला ही असंच मरण याव’ केके यांच्या निधनानंतर प्रसिद्ध गायिका झाली भावुक

KK Death | रात्री उशिरा मृतदेह घेऊन घरी पोहोचणार कुटुंबीय, तर मुंबईत होणार केके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

हे देखील वाचा