Wednesday, July 3, 2024

कंगना राणौत सुब्रमण्यम स्वामींवर भडकली; म्हणाली, ‘महिला फक्त सेक्स करण्यासाठी नसतात, तर…’

विजयादशमीच्या दिवशी लाल किल्ल्यावर रावण दहन केल्यानंतर कंगना रणौत आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जुंपली आहे. कंगना रणौतने बाण चालवून रावण दहन केल्यानंतर स्वामी यांनी महिलेकडून रावण दहन करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कंगना रणौतने स्वामींना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. कंगना रणौत आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात वारंवार वाद होत असतात. यापूर्वीही या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत.

कंगना रणौतने (kangana ranaut) आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते, “स्विमसूटमधला एक फोटो आणि घाणेरडी स्टोरी लिहून तुम्ही मला सल्ला देत आहात? राजकारणात तुम्ही हे काय करत आहात? मी हिंदी सिनेमासृष्टीतली महान कलाकार आहे. मी लेखिका, दिग्दर्शक, निर्माती आणि क्रांतीकारी आहे. तुम्ही काय सांगू पाहात आहात माझ्याकडे माझ्या शरीराशिवाय काही नाही हेच ना?”

 “लक्षात ठेवा महिला फक्त सेक्स करण्यासाठी नसतात. त्यांच्याकडे हात, पाय, मेंदू, हृदय असे सगळे अवयव असतात. बाकी सगळं जे पुरुषाकडे असतं किंवा एक महान नेता बनण्यासाठी जरुरी आहे ते आमच्याकडे असतं मग आम्ही ते का बनू नये? सुब्रमण्यमजी उत्तर द्याल?” असे कंगना म्हणाली. कंगना रणौतच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक कंगना रणौतच्या समर्थनात उभे राहिले आहेत तर काही लोकांनी तिच्यावर टीका केली आहे.

 दरम्यान, कंगना राणौतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता ज्यामध्ये अभिनेत्री बिकिनी परिधान करत होती. तेजसमध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे, या चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपीने केली आहे. तेजसचे लेखन आणि दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे. तर रॉनी स्क्रूवाला निर्माते आहेत. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेजसमध्ये, कंगना रणौतने महिला पायलट तेजस गिलची भूमिका साकारली आहे, जी हवाई दलाच्या आत्म्याची कथा दाखवते. (women are not just for sex they have other parts too Famous actress kangana ranaut furious answer on bjp leader subramanian swamy statement)

आधिक वाचा-
अंकिता लोखंडे हिच्यावर संतापला विकी जैन, थेट काढली लाज; चाहते म्हणाले…
विनोदवीर दादांच्या ‘या’ सिनेमातील लावणी आणि भजन 45 वर्षानंतरही घालते रसिकांना भुरळ

हे देखील वाचा