Wednesday, July 3, 2024

अली फजलच्या पोस्टवर ‘वंडर वुमन’कडून प्रेमाचा वर्षाव, ‘या’ सिनेमात झळकणार एकत्र

फार कमी बॉलिवूड अभिनेत्यांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळते. मात्र, ज्यांना ही संधी मिळते, ते नक्कीच त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक अभिनेता म्हणजे अली फजल. अली ‘डेथ ऑन द नाईल’ चित्रपटात लिनेट डॉयलच्या (गॅल गॅडोट) हत्येप्रकरणी संशयित म्हणून दिसणार आहे. अलीने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो त्याचा सह-अभिनेता, दिग्दर्शक केनेथ ब्रानाघ, चित्रपटातील सर्व कलाकार आणि तांत्रिक कर्मचारी यांचे आभार मानत आहेत. हा चित्रपट अगाथा क्रिस्टी याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

गॅल गॅडोटसोबतचा (Gal Gadot) एक फोटो शेअर करत अलीने (Ali Fazal) लिहिले की, “डेथ ऑन द नाईल लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अगाथा क्रिस्टीच्या एका पात्राद्वारे अमर होण्याची संधी मिळाली. धन्यवाद केन आणि त्या सर्व अद्भुत कलाकारांचे.” अलीच्या पोस्टवर गॅल गॅडोटने हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

अली फजलची पोस्ट
अलीने आपल्या नोटमध्ये पुढे लिहिले आहे की, “मला आठवते की, हे दृश्ये तयार करणे, दाखवणे आणि केनेथ ब्रानाघची दृष्टी जिवंत करणे किती कठीण होते. मला माहित आहे की, आपण जे करतो ते फक्त एक काम असू शकते, परंतु आपण कलाकार आहोत म्हणून नाही. आम्ही फक्त पुढे जात नाही, तर आम्ही जगाला चांगल्या मूल्याच्या ठिकाणी घेऊन जातो. या चित्रपटाच्या प्रत्येक तंत्रज्ञांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल धन्यवाद.”

केनेथ ब्रानाघने केले ‘डेथ ऑन द नाईल’ चित्रपटाचे दिग्दर्शन
या चित्रपटात दिग्दर्शक केनेथ ब्रानाघही एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याने प्रसिद्ध गुप्तहेर हरक्यूल पॉयरॉटची भूमिका साकारली आहे. ‘वंडर वुमन’ फेम गॅल गॅडोट हिने खून झालेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. आर्मी हॅमर तिचा पती सायमन डॉयलच्या भूमिकेत आहे.

केनेथ ब्रानाघ साकारणार गुप्तहेर हरक्यूल पॉयरॉटची भूमिका
अली फजल व्यतिरिक्त टॉम बेटमन, रसेल ब्रँड, डॉन फ्रेंच, रोझ लेस्ली, सोफी ओकोनेडो, जेनिफर सॉंडर्स आणि लेटिशिया राईट या चित्रपटातील हत्येच्या संशयितांपैकी एक आहेत. २०१७ च्या ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ चित्रपटानंतर केनेथ ब्रानाघची हरक्यूल पॉयरॉटची ही दुसरी भूमिका असेल. हा चित्रपट देखील अगाथा क्रिस्टीच्या त्याच नावाच्या क्लासिक कादंबरीवर आधारित होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा