Monday, April 21, 2025
Home नक्की वाचा चाळीस वर्षापूर्वीची ‘ती’ एक चूक पडली महागात, आजही यातना भोगत आहेत महानायक अमिताभ बच्चन

चाळीस वर्षापूर्वीची ‘ती’ एक चूक पडली महागात, आजही यातना भोगत आहेत महानायक अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हिंदी सिने जगताचे शहनशहा म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच त्यांना बिग बी, महानायक, शहेनशहा अशा अनेक नावांनी गौरवण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दित अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चाळीस वर्षापूर्वी केलेली एक चूक इतकी महागात पडली आहे की त्यांना त्याची शिक्षा आजही भोगायला लागत आहे.काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित हा किस्सा त्यांच्या 40 वर्षांपूर्वीच्या ‘कुली’ चित्रपटातील आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सार यांच्यात फाईट सीक्वेन्स चित्रित करण्यात आला होता. ज्यामध्ये पुनीत इस्सारने बिग बींच्या पोटात इतक्या वेगाने ठोसा मारला की त्यांना अंतर्गत दुखापत झाली. ज्यानंतर अमिताभ बच्चन यांना खूप  रक्तस्त्राव झाला, त्यानंतर त्यांच्या शरीरात रक्त कमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रक्त चढवण्यात आले. यावेळी बिग बींना रक्त देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी रांग लागली होती.

अमिताभ बच्चन यांना त्यांचे रक्त देण्यासाठी अनेक चाहते रुग्णालयात पोहोचले होते, परंतु त्यापैकी एक रक्तदाता होता जो हिपॅटायटीस आजाराने ग्रस्त होता आणि रक्तदान करताना सर्वात मोठी चूक म्हणजे बिग बींना हेपेटायटीस-बीची लागण झालेल्या व्यक्तीने रक्तदान केले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनाही या आजाराची लागण झाली आहे. बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना १८ वर्षांनंतर हिपॅटायटीस बी आजार झाल्याचे निदान झाले.

साल 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना अचानक पोटात दुखू लागले, त्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले. माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार अमिताभ बच्चन यांना आतड्याचा त्रास होता, ज्यामुळे त्यांच्यावर लहान आतड्याची डायव्हर्टिकुलिटिस शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या उपचारादरम्यान अमिताभ यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास असल्याचे समजले.

दरम्यान लिवर सिरोसिस हा असा आजार आहे जो हळूहळू आपले लिव्हर खराब करतो. अभिनेते अमिताभ बच्चन हे अशा गंभीर आजाराशी सामना करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ असणार अमिताभ बच्चन यांचे नवीन निवासस्थान? बिग बींनी 31 व्या मजल्यावर खरेदी केले अलिशान अपार्टमेंट!

जेव्हा 45 वर्षांपूर्वी रेखा यांच्या ‘त्या’ कृत्यामुळे चिडायचे अमिताभ बच्चन, कारण जाणून तुम्हीही हादराल

हे देखील वाचा