‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला


मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींची २५ जुलैला १०२ वी जयंती असते. याचे औचित्य साधुन लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे ‘देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई’ हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले आहे. बाबूजींच्या सुरेल कृष्णधवल काळाचा वेध घेणारे हे कृष्णधवल पुस्तक रसिकांसाठी उपलब्ध झाले आहे .’रीडिफाईन कॉन्सेप्ट्स’ने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लेखक असलेल्या योगेश देशपांडे यांनी चित्रकार म्हणूनदेखील भूमिका बजावली असून ३० हुन अधिक रेखाचित्रे या पुस्तकात रेखाटली आहेत.

गेली अनेक वर्ष योगेश देशपांडे यांनी बाबूजींच्या जीवनप्रवासाचा घेतलेला शोध, काही वैयक्तिक आठवणी, काही प्रासंगिक घटना, विविध कार्यक्रमानिमित्त भेटलेल्या दिग्गज लोकांकडून संकलित केलेले अनुभव, यांचे लघुकथा स्वरूपातील हे आकर्षक पुस्तक तयार होऊन रसिकांच्या भेटीस आले आहे.

योगेश देशपांडे म्हणाले ,’बाबूजींच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगाना लिहिताना मी माझ्या नजरेतून ते पाहत होतो. कारण माझ्या व्यक्त होण्याला चित्ररुपी प्रभावी माध्यम हातात होतं. म्हणूनच कि काय बाबूजींचे सर्व प्रसंग मला प्रत्यक्ष जगायला मिळत होते. त्यामुळे स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्रचित्र शोध घेण्याचा हा अनुभव खऱ्या अर्थानं त्यावरील रेखाचित्र काढली तेव्हा गडदपणे जाणवला. बाबुजींच्या प्रेमापोटी, त्यांच्या गाण्यांवर असलेल्या निर्विवाद आनंदापोटी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेपोटी खरं तर हे पुस्तक करण्याचं ठरवलं आणि ‘देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई’ सारखं एक देखणं चित्र -चरित्र वेध घेणारे पुस्तक निर्माण झालं. (writer director yogesh deshpande book on sudhir phadke)

देशपांडे यांनी १५ ऑगस्ट २०१६ साली बाबूजींच्या आयुष्याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय पक्का केला होता.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निवेदन अश्या अनेक निमित्ताने बाबूजींच्या गाण्यावर असलेली श्रद्धा आणि प्रेम एका बाजूला होतेच, मात्र त्यांनी केलेल्या या अफाट कामामागच्या कष्टाची दुसरी बाजू समजून घ्यावी अशी होती, असेही देशपांडे यांनी सांगितले.

जेष्ठ दिग्दर्शक राम गबाले, बाबा पाठक, आनंद माडगूळकर, श्रीधर फडके यांच्यासह विविध कार्यक्रम करत असताना, बाबूजींचे अनेक पैलू, आठवणी, घटना प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या, हे खरं तर मी भाग्य समजतो, असे योगेश देशपांडे आवर्जून सांगतात.

नव्या पिढीला एक यशस्वी कलाकार कसा घडतो हे सांगून, त्यांच्या अनुभव विश्वातून काही नवे शिकायला मिळाले तर कदाचित नवी प्रेरणा मिळेल. नवं तरुणांना संगीत क्षेत्रात काहीही नवीन करताना, त्या कला निर्मितीचा दर्जा अधिक उंचावताना मदत होईल, या प्रेरणेतून हे पुस्तक घडले आहे . बाबूजींच्या १०२ व्या जयंती निमित्त प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे स्वागतमूल्य १०२ रुपये असेच ठेवण्यात आले आहे .

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.