Tuesday, July 9, 2024

‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल, लेखकाने कथेशी संबंधित केला मोठ्ठा खुलासा

साल २०१५मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाचे नाव ‘बजरंगी भाईजान’ होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. हा चित्रपट बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. अशा परिस्थितीत, आता सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलबद्दल एक मोठे अपडेट येत आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या लेखकाने भाग २च्या कथेवर मोठे विधान केले आहे. 

‘बजरंगी भाईजान २’ ची कथा कशी असेल?
खरं तर, ‘बजरंगी भाईजान’च्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त, चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी एका मीडिया मुलाखतीत ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलबद्दल खुलेपणाने संवाद साधला आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी ‘बजरंगी भाईजान २’ बनवण्याची योजना आखली आहे. विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, “बजरंगी भाईजान २ची कथा पहिल्या भागाच्या तुलनेत खूपच वेगळी असणार आहे. यावेळी बजरंगी भाईजानची कथा १० वर्षांच्या लीपमध्ये दाखवण्यात येणार आहे. जे नेहमीपेक्षा अधिक मनोरंजक असेल. सध्या मी चित्रपटाच्या कथेवर लक्ष केंद्रित करत आहे. याची एक छोटीशी गोष्ट मी सलमान खानला सांगितली आहे. जी त्यालाही आवडली. (writer vijayendra prasad spoke about salman khan bajrangi bhaijaan 2)

वेगळे असेल ‘बजरंगी भाईजान’चे शीर्षक
विशेष म्हणजे, २०२१ साली बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने पुष्टी केली होती की, त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल बनवला जाईल आणि त्याचे नाव पवन पुत्र भाईजान असेल. मात्र, ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्याकडून या प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण सलमानच्या ‘टायगर ३’नंतर या चित्रपटाचा विचार होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा