Thursday, July 18, 2024

लग्नाच्या साध्या लूकबद्दल पहिल्यांदाच बोलली यामी गौतम; इंडस्ट्रीतील डिझायनर्सबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सध्या तिच्या ‘दसवीं’ चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात यामी गौतम महिला आयपीएस अधिकारी ज्योती देसवालच्या भूमिकेत चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटात यामी गौतमसोबत अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि निमृत कौरही (Nimrit Kaur) भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिने आपल्या लग्नाचे अनेक किस्से सांगितले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या लग्नातील पेहरावाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

यामी गौतम ही हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या चित्रपटांची आणि अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्री यामी गौतमच्या लग्नाचीही याआधी चांगलीच चर्चा रंगली होती. कारण कसलाही बडेजाव न करता या अभिनेत्रीने गुपचूप विवाह उरकला होता त्यामुळे या लग्नाच्या अचानक आलेल्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरीसोबत हिमाचल मध्ये विवाह केला होता. हल्ली हिंदी चित्रपट जगतात लग्न म्हणले की कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जातो. मात्र यामी गौतमच्या या साधेपणाचे खूप कौतुक करण्यात आले होते. यावेळी तिने आईची साडी लग्नात घातली होती. याबद्दलचा खुलासा तिने अलिकडेच केला आहे.

याबद्दल बोलताना तिने सांगितले की, “तिच्याकडे अनेक चांगले चांगले डिजायनर होते, पण बॉलिवूडमधील आणि फॅशन जगतातील काही स्वार्थी लोकांमुळे आणि त्यांच्या वागण्यामुळे ती खूप दुखावली आहे. हे लोक आपल्याशी नीट वागत नाहीत, कारण आपण त्यांच्या मनासारखे नसतो.” हे लोक खूप स्वार्थी आणि मतलबी असतात असेही ती म्हणाली. तसेच हे मत सगळ्या डिजायरनना लागू होत नाही, असे मतही तिने यावेळी व्यक्त केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा