Sunday, August 3, 2025
Home अन्य चित्रपटाच्या सेटवर झाली होती ओळख, अशी आहे यामी गौतम आणि आदित्य धरची गोड लवस्टोरी

चित्रपटाच्या सेटवर झाली होती ओळख, अशी आहे यामी गौतम आणि आदित्य धरची गोड लवस्टोरी

अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी ४ जून रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले. यामी गौतमच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशमध्ये दोघांचे लग्न झाले होते. यामीचे चाहते या लग्नामुळे खूप खूश होते. पण अचानक दोघांनी घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच सुखद धक्का बसला होता. दोघांनीही कोणताही गाजावाजा न करता पूर्ण रितीरिवाजाने लग्नगाठ बांधली. शनिवार ( ४ जून) त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या लवस्टोरीबद्दल.

बहुतेक लोकांच्या प्रेमकहाणीची सुरुवात मैत्रीपासून होते. यामी आणि आदित्य धरच्या बाबतीतही तेच आहे. दोघेही आधी एकमेकांसाठी अनोळखी होते. दोघांमध्ये फक्त व्यावसायिक संबंध होते. पण, 2019 च्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील संभाषण सुरू झाले. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आणि प्रमोशन सुरू झाल्यानंतर, संभाषण थोडे पुढे गेले आणि दोघे चांगले मित्र बनले. लवकरच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 04 जून 2021 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाच्या दिवशीही त्यांच्या नात्याबाबत कोणालाच माहिती मिळाली नाही.

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केल्यावर सर्वांनाच धक्का बसला. दोघांनी गेल्या वर्षी कोविड प्रोटोकॉलमध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी येथे लग्न केले होते. लग्नाला फक्त 18 लोक उपस्थित होते. अभिनेत्री यामी गौतमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक गोड व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या लग्नातील अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओवर यामीच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देत दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा