Friday, July 5, 2024

यामी गौतमने ‘या’ व्यक्तीला म्हटले तिच्या आयुष्यातील ‘वन मॅन आर्मी’; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न उराशी बांधून अनेक लोकं अभिनयाच्या सृष्टीत येतात. अभिनयाची सुरुवात करण्यासाठी अनेक कलाकार मालिकांची किंवा जाहिरातींची वाट धरतात आणि तिथून सिनेमांमध्ये जातात. मालिकांमधून चित्रपटात येणाऱ्या कलाकारांची यादी भली मोठी आहे. अगदी शाहरुख खान, विद्या बालन पासून ते अगदी अलीकडच्या सुशांत सिंग राजपूतपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी टीव्हीसोबतच चित्रपटांची वाट धरली. यातलेच एक नाव म्हणजे यामी गौतम.

आपल्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या यामीने ४ जूनला दिग्दर्शक आदित्य धरसोबत लगीनगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे यामीने अतिशय साध्या आणि खासगी स्वरूपाच्या समारंभात लग्न केले. यामीने अचानक दिलेली ही आनंदाची बातमी ऐकूण फॅन्ससोबतच कलाकारांनी देखील तिच्यावर आणि आदित्यवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यामीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि बहीण सुरेलीसोबतच एक फोटो पोस्ट केला असून, सोबत एक संदेश देखील लिहिला आहे. यामीने शेअर केलेल्या फोटोमध्ये यामीची बहीण तिचे केस नीट करताना दिसत आहे. तर यामी हिरव्या साडीत, भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात चुडा अशा नव्या नवरीच्या सुंदर रूपात दिसत आहे.

या फोटोसोबत यामीने लिहिले, ” वन मॅन आर्मी…माझ्या शहरातही लॉकडाऊन असल्याने केवळ एक तासाच्या आत आम्ही लग्नाची खरेदी केली. जे जे काही हाताला लागले ते घेतले. माझ्या हेअर स्टाइलपासून ते मला अतिशय सुंदर असे तयार करण्यासाठी, मला अपेक्षित लुक देण्यासाठी, माझे दरवेळी तुझ्या विनोदांनी मनोरंजन करण्यासाठी, मी नर्वस होऊ नये म्हणून माझ्यासोबत प्रत्येक मिनिटाला राहण्यासाठी, एंडलेस यादी बनवण्यासाठी, चहा पिण्यासाठी, घरीच केक बनवण्यासाठी आणि अजून अनेक गोष्टींसाठी खूप धन्यवाद.”

कुटुंबाबद्दल यामीने लिहिले, “कोणत्याही अटीशिवाय माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझ्यावर झालेल्या मजबूत आणि मिडल क्लास संस्कारांमुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. या गोष्टींसाठी मी जगातली कोणतीही गोष्ट सोडू शकते. या प्रेमासाठी आणि आदरासाठी खूप धन्यवाद.” या पोस्टसोबत यामीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिची बहीण तिला लग्नासाठी तयार करताना दिसत आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे यामीला तिच्या लग्नासाठी लोकांवर मर्यादा होत्या. त्यामुळे तिच्या बहिणीने यामीच्या तयारीची सर्व जबाबदारी उचलली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स

-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य

-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ

हे देखील वाचा