प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या संकटांचा, वेगवेगळ्या परिस्थितीचा, सामना करत असतो. यामध्ये आर्थिक, व्यायसायिक आदी समस्यांपासून आरोग्य, मानसिक समस्यांपर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश होतो. याला कलाकार देखील अपवाद नाही. कलाकार देखील त्यांच्या जीवनात खूप श्रीमंत, प्रसिद्ध, लोकप्रिय असले तरी ते देखील अनेक अडचणींना तोंड देत असतात. फरक फक्त एवढाच असतो, आपण त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या ते कधीही जगासमोर आणत नाही. सतत त्यांचा आनंदी चेहराच सर्वांना दाखवतात. अनेक कलाकार त्यांच्या जीवनात विविध आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असतात. बऱ्याच कलाकारांबद्दल आपल्याला माहित असते, पण काही कलाकार त्यांच्या या समस्यांबद्दल बोलणे टाळतात. यात बहुतकरून अभिनेत्री तर त्यांच्या कोणत्याही आरोग्याच्या समस्यांबद्दल कधीच बोलत नाही. अशातच टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री यामी गौतमने तिच्याबद्दल एक खुलासा केला आहे.
सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करणारी यामी सध्या तिच्या या खुलाशामुळे खूपच चर्चेत आली आहे. यामीने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिला असलेल्या एक त्वचा रोगाबद्दल सांगितले आहे. यामीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “हॅलो माझी इन्स्टा फॅमिली, नुकतेच मी एक फोटोशूट केले. फोटोशूटनंतर माझे फोटो पोस्ट प्रोडक्शनकडे माझा त्वचा विकार ‘केराटोसिस-पिलारिस’ लपवण्यासाठी जाणार होते. ही खूपच सामान्य बाब आहे. तेव्हा मी स्वतःला म्हणाले, यामी तू आता हे स्वीकार का करत नाही? जे लोकं या आजाराबद्दल अनभिज्ञ आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की, हा एक त्वचा रोग आहे, ज्यामध्ये चेहऱ्यावर छोटे छोटे दाणे येतात. यावर कोणताही उपचार नाही.”
लोकांमुळे आणि आत्मविश्वास नसल्यामुळे हा आजार अधिक गंभीर होतो हे सांगताना तिने लिहिले, “मला वाटते हे इतके पण वाईट नसते जितके तुमचे डोके आणि तुमच्या शेजारचे लोकं तयार करतात. मला हा आजार मी किशोरवयीन असताना झाला. मी अनेक वर्ष हा आजार सहन करते. मात्र आता मी माझी भीती आणि असुरक्षा यावर मात केली करत सत्य स्वीकारण्यासाठी हिंमत केली आणि माझ्यात असणाऱ्या कमतरता स्वीकारल्या. सोबतच मी माझे हे सत्य तुमच्यासोबत शेअर करण्याचे साहस देखील मिळवले आहे.”
यामीच्या या पोस्टवर फॅन्स आणि नेटकऱ्यांसोबत इंडस्ट्रीमधील अनेक लोकं तिचे कौतुक करत तिच्या या पावलांसाठी तिचे अभिनंदन करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…