Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड पती आदित्य धरसह सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली यामी, लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले जोडपे

पती आदित्य धरसह सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली यामी, लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले जोडपे

लग्नाची बातमी समोर आल्यापासून, अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे बनले आहेत. दोघांनी हिमाचल प्रदेशमध्ये याच वर्षी गुपचूप लग्न केले. त्यानंतर दोघेही त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. अलीकडेच, यामी पती आदित्य धरसह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचली. इथून अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत खूप खुश दिसत आहे.

यामीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत, जे सुवर्ण मंदिराला भेट देताना काढलेले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, यामी आणि आदित्य एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसत आहेत. हा फोटो दोघांच्या मागून क्लिक केला गेला आहे, ज्यामुळे यामीचा चेहरा फोटोमध्ये स्पष्ट दिसत नाही. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही कॅमेरासमोर स्माईल करून पोझ देत आहेत. (yami gautam visited golden temple with husband aditya)

चाहत्यांना भावला जोडप्याचा पारंपारिक अंदाज
या फोटोंमध्ये यामीने गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. यासोबत तिने कपाळावर लाल टिकली लावली आहे आणि हातात लाल रंगाचा चुडाही घातला आहे, ज्यात यामी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक नव्या नवरीपेक्षा कमी दिसत नाहीये. आदित्यने पांढऱ्या कुर्ता-पायजमासोबत काळ्या रंगाचा कोट घातला आहे. या फोटोंमध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. यामी आणि आदित्यचे ही फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. प्रत्येकजण जोडप्याचे कौतुक करताना दिसतोय.

‘उरी’मध्ये केलंय एकत्र काम
यामी गौतम आणि आदित्य धर यांनी ४ जून २०२१ रोजी, लग्न केले. दोघांनी लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते, मात्र चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत कुणालाच याची माहिती नव्हती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केले होते. यामीने गुड न्यूज म्हणून, तिच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात दोघे वर-वधूच्या वेशात दिसत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

-यामी गौतमने तिच्या हनीमूनबद्दल केला मोठा खुलासा; जे ऐकून सैफ अली खानही झाला ‘शॉक!’

-यामी गौतमची ‘कार्बन कॉपी’ आहे टीव्हीची ‘ही’ अभिनेत्री; चेहऱ्यातील साधर्म्य पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा