Tuesday, July 9, 2024

यश कुमार आणि काजल राघवानी यांचे नवे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार लग्नानंतरचे प्रेम

भोजपुरी चित्रपट आता जगभरात प्रसिद्ध आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीची गाणी केवळ भोजपुरीमध्येच नाही तर संपुर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सगळेजण त्यांच्या गाण्यांची वाट बघत असत.मागील काही दिवसात भोजपुरी मध्ये अनेक गाणी प्रदर्शित झाली आहे. अशातच भोजपुरी अभिनेता यश कुमार आणि अभिनेत्री काजल राघवानीचे एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

भोजपुरी क्वीन काजल राघवानी आणि अभिनेता यश कुमार लवकरच भोजपुरी चित्रपट ‘दंडनायक’मध्ये एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी यातील ‘ए चांद कही छुप जा’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. (Yash Kumar and kajal raghwani new song released on you tube)

नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे एक रोमँटिक साँग आहे. ज्यात यशकुमार आणि काजल यांची केमेस्ट्री दिसत आहे. या गाण्याची सुरुवात काजल आणि यश यांच्या लग्नाच्या रात्रीने होते. यानंतर ते दोघे त्यांचे कौटुंबिक आयुष्य जगतात.

‘ए चांद कही छूप जा’ या गाण्याला विजय चौहान आणि प्रियांका सिंग यांनी त्यांचा आवाज दिला आहे. या गाण्याचे होल राजेश मिश्रा यांनी लिहिले आहेत. तसेच मुन्ना दुबे यांनी संगीत दिले आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यांचे चाहते या व्हिडिओवर प्रेम दर्शवत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा