Thursday, May 1, 2025
Home साऊथ सिनेमा ‘KGF 2’ यशचा चित्रपट ओटीटीवर रिलीझ होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी पाहू शकता घरबसल्या चित्रपट

‘KGF 2’ यशचा चित्रपट ओटीटीवर रिलीझ होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी पाहू शकता घरबसल्या चित्रपट

रॉकिंग स्टार यशने ‘KGF Chapter 2’ ने पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याला सर्वच भाषांमध्ये पसंती मिळत आहे. विशेषत: हिंदी भाषेत या चित्रपटाने प्रदर्शित होताच सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यासोबतच चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, यश आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ ची लोकांची क्रेझ पाहता कंपन्यांनी सॅटेलाइट आणि प्रीमियरसाठी जाहिरात स्लॉट बुक करणे सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर दार ठोठावण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तथापि, ‘KGF Chapter 1’ चित्रपटाचा पहिला भाग ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर आधीच उपलब्ध आहे.

माध्यमातील वृत्तानुसार आता ‘KGF Chapter 2’ चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ८ आठवड्यांनी OTT वर स्ट्रीम केला जाईल. याशिवाय चित्रपटाच्या टीव्ही प्रीमियरसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती आहे की निर्मात्यांनी त्याचे सॅटेलाइट हक्क ‘जी’ ला विकले आहेत. झी तामिळ, झी कन्नड, झी केरलम आणि झी तेलुगुवर या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

याशिवाय, चित्रपटाचा हिंदी डब सोनी मॅक्सवर प्रीमियर होईल, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, तूर्तास याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाची गेले २ वर्ष सगळेच वाट पाहत होते. परंतु कोरोना महामारीमुळे चित्रपट प्रदर्शित झाला नाही. एका चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा