आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर ‘अल्फा‘ हा YRF spy universe चा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. निर्मात्यांनी आज ‘अल्फा’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. YRF स्पाय युनिव्हर्समध्ये बॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘पठाण’, ‘वॉर’ आणि आगामी ‘वॉर 2’ यांचा समावेश आहे. मात्र, या चित्रपटातील स्टार्सचा लूक अद्याप समोर आलेला नाही.
‘अल्फा’च्या निर्मात्यांनी अखेर आज या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. वास्तविक, YRF ने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ख्रिसमस 2025 रोजी, अल्फा उदयास येईल! ॲक्शन-पॅक्ड हॉलिडेसाठी तयार व्हा… 25 डिसेंबर 2025.”
आलिया आणि शर्वरी या दोघीही या चित्रपटात सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनसाठी दोन्ही अभिनेत्रींनी खूप मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या ॲक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. त्याने यापूर्वी धूम 3, शाहरुख खान स्टारर फॅन आणि आर माधवनचा द रेल्वे मॅन या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अल्फा’ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
या सगळ्यामध्ये आलिया भट्ट सध्या जिगरा या सिनेमाच्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात ती वेदांग रैनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आलियाचा जिगरा 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
हेमा मालिनीच्या प्रेमात होते अभिनेते संजीव कुमार; शोलेच्या सेटवर केले होते प्रपोज…