आता २०२१ हे वर्ष सगळ्यांचा निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजन क्षेत्रात अनेक गोष्टी घडल्या आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा करत होते. अनेक गोष्टी बंद होत्या. परंतु प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कलाकार कुठेही कमी पडले नाही. त्यांनी घरबसल्या सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. टेलिव्हिजनवर अनेक रियॅलिटी शो झाले. ज्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चला तर जाणून घेऊया २०२१ मध्ये कोणते रियॅलिटी शो चर्चेत राहिले आणि या शोचे विजेते कोण झाले.
बिग बॉस १४ (Bigg Boss 14)
यावर्षी कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस १४‘ हा शो सर्वात जास्त चर्चेत होता. बिग बॉसच्या घरात अनेकांनी प्रवेश केला होता. परंतु टॉप २ मध्ये रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य होते. दोघांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. या शोमध्ये रुबीना विजेती झाली, तर राहुल उपविजेता झाला.
खतरों के खिलाडी ११ (Khatron ke khiladi 11)
‘खतरों के खिलाडी ११‘ ने यावर्षी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. रोहित शेट्टीने या शोचे होस्टिंग केले होते. सगळ्यांना हे पर्व खूप आवडले होते. सगळेच तोडीस तोड होते. परंतु सगळ्यांना मागे सारत अर्जुन बिजलानीने या सिजनच्या ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले आणि २० लाख एवढी रक्कम जिंकली.
डान्स दिवाने ३ (dance deewane 3)
टेलिव्हिजनवर अनेक डान्स रियॅलिटी शो असतात. परंतु २०२१ मध्ये ‘डान्स दिवाने ३‘ या शोने सगळ्यांचे मनोरंजन केले. हा शो पियुष गुरुभेले आणि रुपेश सोनी यांनी जिंकली. ट्रॉफीसोबत या जोडीने ४० लाख आणि एक कार जिंकली आहे. त्यांनी शोमधून खूप लोकप्रियता मिळवली. या शोचे परीक्षण माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया करत होते.
सुपर डान्सर ४ (super dancer 4)
आणखी एक डान्स शो खूप चर्चेत राहिले होता. ‘सुपर डान्सर ४‘ या शोने सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. या शोची विजेती आसामची डान्सर फ्लोरिन गोगोई झाली होती. हा शो या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरु झाला होता. या शोमध्ये तिने १५ लाख रुपये जिंकले होते. त्यातील ५ लाख रुपये तिचा मेंटर तुषार शेट्टीला दिले होते.
बिग बॉस ओटीटी (bigg boss ott)
‘बिग बॉस ओटीटी‘ यावर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. या शोची विजेता दिव्या अग्रवाल झाली. या शोचे होस्टिंग करण जोहरने केले होते.
इंडियन आयडल १२ (India Ideol 12)
‘इंडियन आयडल १२‘ ने यावर्षी इतिहास रचला आहे. हा शो तब्बल आठ महिने चालू होता. या शोचा विजेता पवनदीप राजन झाला. या शोने सगळ्यांचे मनोरंजन केले. या शोची उपविजेता अरुणिता कांजीलाल झाली होती. त्यांच्यात चांगलीच स्पर्धा झाली होती.
सारेगामापा (saregamapa)
सिंगिंग रियॅलिटी शो ‘सारेगामापा‘ देखील चांगलाच चर्चेत आला होता. स्पर्धकांच्या सुमधुर गाण्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. यास शोचा विनर अर्कदीप मिश्र झाला होता.
हेही वाचा :