Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर खोटे ठरलेले शिक्के ज्यांनी रिलीज पूर्वी केला होता खळखळाट; विकी विद्या ते आलीया ठरले फ्लॉप…

बॉक्स ऑफिसवर खोटे ठरलेले शिक्के ज्यांनी रिलीज पूर्वी केला होता खळखळाट; विकी विद्या ते आलीया ठरले फ्लॉप…

2024 हे वर्ष काही दिवसात निरोप घेणार आहे. हे वर्ष सिनेमाच्या दृष्टीने खास ठरले. अनेक बिग बजेट चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र, काही चित्रपटांची जादू बॉक्स ऑफिसवर चालली नाही. त्यामुळे काही चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरले. यामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे, ज्यांची जादू बॉक्स ऑफिसवर चालू शकली नाही.

जिगरा

आलिया भट्टचा ‘जिगरा’ चित्रपट ज्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, तो बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या हृदयावर आपली जादू चालवण्यात यशस्वी झाला नाही. हा चित्रपट 80 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर केवळ 31.98 कोटींची कमाई केली.

बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट 350 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनला होता. बॉक्स ऑफिसवर केवळ 111.49 कोटींची कमाई करत हा चित्रपट फ्लॉप ठरला.

विकी विद्या का वो वाला व्हिडिओ

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपटही चाहत्यांवर जादू करू शकला नाही. हा चित्रपट चालला पण बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट 30 कोटी रुपयांमध्ये बनला होता आणि बॉक्स ऑफिसवर 41.93 कोटींची कमाई केली होती.

मिस्टर आणि मिसेस माही

शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट 40 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 35.55 कोटींची कमाई करू शकला. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाची जादू चाहत्यांवर चांगली चालली नाही.

औरों में कहाँ दम था

100 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेला ‘औरों में कहाँ दम था’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 15.79 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण दिसले होते.

मैदान 

अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपटही यावर्षी काही खास करू शकला नाही. या चित्रपटाचे बजेट 235 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट केवळ 53.03 कोटींची कमाई करू शकला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

तीन भावांनी चालवलेली नवकेतन फिल्म्स कशी पडली बंद ? देव, चेतन आणि गोल्डी आनंदच्या प्रवासाचा आढावा घेणारा लेख…

हे देखील वाचा