Tuesday, July 9, 2024

जंगल पार करून शिवांगी अन् मोहसिन जातील का ‘बिग बॉस’च्या घरात? मिळालीय ‘इतक्या’ कोटींची ऑफर

‘बिग बॉस ओटीटी’ शेवटच्या टप्प्यात पोहचले आहे, तर टीव्हीवरील ‘बिग बॉस’चे १५वे पर्व लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वाचा प्रोमो देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. यामध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खान सूत्रसंचालन करणार आहे. तसेच या शोमधील टास्क हे आणखी जास्त कठीण असणार आहेत, असेही बोलले जात आहे. बऱ्याच दिवसांनी सलमान या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याने, चाहते हा शो सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात यामध्ये टीव्ही मालिकांमधील मोठे आणि प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वामध्ये ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेतील सुप्रसिद्ध जोडी झळकणार आहे. शिवांगी आणि मोहसिन खान ही जोडी ‘बिग बॉस’मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु असल्याने चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या दोघांनी छोट्या पडद्यावर दमदार भूमिका साकारून रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिकेमध्ये दिसत असलेली त्यांच्यातील केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे हे दोघे बिग बॉसच्या घरात आले, तर या शोचा मोठा फायदा होईल.

‘ये रिश्ता क्या केहलाता है’ ही मालिका साल २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेव्हा पासून आता पर्यंत तब्बल ५ वर्षे शिवांगी आणि मोहसीनने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. सध्या ही मालिका देखील लवकरच संपण्याच्या मार्गावर पोहचली आहे. जसे ही मालिका आता लवकरच संपणार आहे हे समजले, तसे शिवांगी आणि मोहसिनला अनेक शोसाठी आणि नवीन मालिकांसाठी दिग्दर्शकांचे फोन येण्यास सुरुवात झाली. त्यातीलच एक बिग बॉस. या शोमध्ये येण्यासाठी या दोन्ही कलाकारांना ४ कोटींच्या मानधनाची ऑफर केली आहे. परंतु या दोघांचे त्यांच्या मालिकेमधील संपूर्ण शूटिंग संपलेले नसल्याने, ते दोघेही या शोमध्ये जायचे की नाही याचा सध्या तरी विचारच करत आहेत.

या शोमध्ये येण्यासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्याच्या २५ ते ३० तारखे पर्यंत कॉरंटाईन केले जाणार आहे. सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या या शोमध्ये स्पर्धकांना एका जंगलातून वाट काढल्यानांतर बिग बॉसचे दरवाजे उघडणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा