Thursday, June 12, 2025
Home अन्य शिवांगी जोशीने बीचवर दाखवली ग्लॅमरस स्टाईल, काळ्या रंगाच्या शॉर्ट आउटफिटमध्ये कमाल दिसतेय अभिनेत्री

शिवांगी जोशीने बीचवर दाखवली ग्लॅमरस स्टाईल, काळ्या रंगाच्या शॉर्ट आउटफिटमध्ये कमाल दिसतेय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. त्या सतत आपल्या काही ना काही पोस्ट चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. याचप्रमाणे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवांगी जोशी ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिश लूकमुळे, तर कधी तिच्या क्यूटनेसमुळे. पुन्हा एकदा असेच काहीसे घडत आहे. शिवांगी जोशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिवांगीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. शिवांगीची क्यूटनेस पाहून चाहते तिच्यावर भुरळताना दिसत आहेत. व्हिडिओतील शिवांगीचा मनमोहक अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिच्या या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

शिवांगीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा निरोप घेतला आहे. आजकाल ती तिचा ब्रेक एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतीच शिवांगी तिच्या मैत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेली होती, जिथे तिने खूप धमाल केली. आता नुकताच शिवांगीने तिच्या दुबई ट्रिपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नाचताना दिसत आहे. शिवांगीला आजवर प्रेक्षकांनी बहुतेक सुसंस्कृत सुनेच्या स्टाईलमध्ये पाहिले असले, तरी व्हिडिओमध्ये ती आता बेबच्या रुपात दिसत आहे.

व्हिडिओमध्ये शिवांगी जोशीने ब्लॉक शॉर्ट आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. शिवांगीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबत तिने अनेक फोटोही शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. तिच्या शो आणि क्यूटनेसशिवाय शिवांगी टीव्ही अभिनेता मोहसीन खानसोबतच्या तिच्या नात्यामुळेही चर्चेत असते. मात्र, अनेक माध्यमांतील वृत्तामध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शोमधील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा