Monday, July 1, 2024

वरुणराजाच्या प्रतिक्षेत व्याकुळ झालेल्या मुलांची ह्रदयस्पर्शी कथा, जाणून घ्या ‘येरे येरे पावसा चित्रपटाबद्दल

मराठी सिनेजगतात सध्या अनेक नाविण्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. ज्याला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी तर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. पावनखिंड, फर्जंद सारख्या दमदार चित्रपटांना जगभरातील शिवप्रेमींचा अभूतपुर्व असा प्रतिसाद पाहायला मिळाला. यानंतर आता पुन्हा एकदा एक आगळीवेगळी कथा प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट म्हणजे 17 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘येरे येरे पावसा’ चित्रपट. काय आहे या चित्रपटाची कथा चला जाणून घेऊ.

वाट पाहणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव देणारा प्रसंग असतो. आणि याला प्रत्येकानेच तोंड दिलेले असते. एखाद्या खास क्षणाची वाट पाहण, किंवा एखाद्या खास व्यक्तीची वाट पाहण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी वाट पाहण्याच्या भावना मात्र एकच असतात. हा वाट पाहण्याचा अनुभव कधी कधी लांबत जातो तर कधी अपेक्षाभंग करतो. अशीच वाट पाहायला लावणारी कथा येरे येरे पावसा चित्रपटात रंगवली आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.

‘येरे येरे पावसा’ चित्रपटातही अशाच एका खेडेगावाची कथा रंगवली आहे. ज्यामध्ये सर्वजण वरुणराजाची वाट पाहत असल्याचे दाखवले आहे. पाऊस कधी येईल आणि कधी सर्वांनाच चिंब भिजवेल याची या चिमुरड्यांना चिंता लागलेली आहे. म्हणूनच ती पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. मेघराजाचे झालेले आगमन आणि वाट पाहिल्यानंतर अचानक बरसलेल्या सरींनी आनंदून गेलेली ही पोरं यावरच भाष्य करणारा हा चित्रपट सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शारीख खान यांनी तर लेखन शफक खान यांनी केले आहे. पाऊस आणि गावकऱ्यांच सुंदर नात मांडणारा हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा