Saturday, July 6, 2024

फेटा अन् मुंडावळ्या बांधून ओम झालाय लग्नासाठी तयार, दिसतोय एकदम हँडसम

टीव्हीवरील सर्वांची आवडती वाहिनी म्हणून ‘झी मराठी’ मराठीला ओळखले जाते. या वाहिनीवरील अनेक मालिका आता संपण्याच्या वळणावर येऊन पोहोचल्या आहेत. मात्र, यातील एक मालिका चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ती मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ होय. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालविकाने अनेक प्रयत्न करून देखील स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाचा विजय झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मालिकेत त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे. तसेच आता लग्नाचे संगीत आणि मेहंदी असे सगळे फंक्शन दाखवले जात आहेत. तसेच येणाऱ्या काही भागांमध्ये त्यांचा लग्न सोहळा देखील दाखवला जाणार आहे.

स्वीटू आणि ओमच्या लग्नाचा टेलिव्हिजनवर दोन तासाचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. त्यांच्या लग्नाचे काही प्रोमो समोर आले आहेत. यात स्वीटूचा लूक समोर आला आहे. स्वीटू नवरीच्या वेशात अत्यंत सुंदर दिसत आहे, पण अजूनही ओमचा नवरदेवाच्या वेशातील लूक समोर आला नव्हता. आता नुकताच ओमचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ओम खूपच हँडसम दिसत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ओमच्या लग्नाचा लूक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ओमने मरून रंगाची शेरवानी घातली आहे. डोक्यावर आकाशी रंगाचा फेटा बांधला आहे. तसेच मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. या लूकमध्ये तो खूपच सुंदर दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (yeu kashi tashi mi nandayala om’s groom look viral on social media )

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ओम आणि स्वीटूचे पात्र शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे निभावत आहेत. त्या दोघांची मालिकेतील लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक त्या दोघांच्या लग्नाची वाट बघते होते. अखेर तो क्षण आला आहे, पण आता मालविका त्यांच्या लग्नात आणखी काय विघ्न आणणार आहे आणि ते विघ्न पार करून स्वीटू आणि ओमचे लग्न कसे होणार आहे, हे पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक उत्सूक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा