Tuesday, July 9, 2024

‘ओय तुनक तुनक ओय!!’ हीच का ती स्वीटू? पंजाबी लूकमध्ये दिसली अभिनेत्री अन्विता फलटणकर

दैनंदिन जीवनातील विरंगुळा घालवण्यासाठी प्रेक्षकांची पहिली पसंत आहे टीव्ही मालिका. उत्तम स्टोरी व योग्य सादरीकरण असेल, तर ती मालिका हिट झालीच म्हणून समजायचं. अशीच एक मालिका सध्या टीव्हीच्या जगात धुमाकूळ घालतेय, ती आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेतील ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना विशेष भावली. त्यातील स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या चर्चेचा विषय म्हणजे, एक फोटो. जो सध्या व्हायरल होत आहे.

अन्विता फलटणकर आता मालिकेमध्ये एका पंजाबनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. याच लूकमधील तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो झी मराठी चॅनलच्या अधिकृत अकाऊंटवरून रिपोस्ट करण्यात आला आहे, जो अन्विताने देखील तिच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, या पंजाबी लूकमध्ये स्वीटू बऱ्यापैकी गोंडस दिसत आहे. म्हणूनच हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पंजाबी बनायचंय. ओय तुनक तुनक ओय.” मालिकेमधील अन्विताच्या ‘स्वीटू’ या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. मालिकेने यातील कलाकारांच्या लोकप्रियतेला एका वेगळ्या स्तरावर नेऊन पोहचवले आहे.

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा