नुकतेच आपण सर्वानी २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत केले. या स्वागतादरम्यान कलाकारांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच उत्साही दिसून आले. रॅपर हनी सिंगने देखील २०२३ चे अतिशय दणक्यात स्वागत केले २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी किंबहुना त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तसे पाहिले तर वाईट ठरले. याचवर्षी त्याचा त्याची पत्नी असलेल्या शालिनी तलवारसोबत घटस्फोट झाला. त्याचा हा घटस्फोट तुफान गाजला. यादरम्यान शालिनीने हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले मात्र सरतेशेवटी त्याचा घटस्फोट सप्टेंबरमध्ये झाला.
हनी सिंगच्या घटस्फोटानंतर काही महिन्यात लगेच त्याच्या आयुष्यात एका नवीन मुलीची एन्ट्री झाली आणि त्याने डिसेंबर २०२२ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्या मुलीची त्याची प्रियसी म्हणून ओळख करून दिली. ती मुलगी म्हणजेच टिना थडानी. हनीने सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा आणि टिनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या फॅन्सला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचा रोमँटिक व्हिडिओ आणि शुभेच्छा देण्याचा रोमँटिक अंदाज त्याच्या फॅन्सला चांगलाच भावत असून हा व्हिडिओ सोशल मीडिया खूपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हनी सिंगने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “‘लवर्सचा सिझन’ सर्व प्रेमात असलेल्या लोकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा शत्रुत्वाचा सिझन नसून, प्रेमाचा सिझन आहे.” यासोबतच त्याने त्याची ही पोस्ट टिना थडानीला टॅग देखील केली आहे. हनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो टीनासोबत ‘मेरी जान’ हे गाणे गाताना दिसत असुन त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून त्यावर एका लॉकेट घातलेले दिसत आहे. यात टिना त्याच्या मागून येऊन त्याला नाकावर किस देखील करताना दिसत आहे. हनीने त्याच्या घटस्फोटाच्या तीन महिन्यानंतर लगेच त्याच्या टीनासोबतच्या नवीन रिलेशनशिपची घोषणा केली होती.
तत्पूर्वी मागील काही वर्षांपासून बॉलिवूड मधील गाण्यांमध्ये रॅप चांगलेच गाजत आहे. चित्रपटांना हिट करण्याचे हे एक नवीन सूत्र निर्मात्यांच्या हाती लागले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच रॅपचा एक निर्माता आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या हनी सिंगल रॅप गाण्यांनी तुफान लोकप्रियता मिळवून दिली. रॅप आणि हनी सिंग या एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. हनी सिंग जेवढा त्याच्या गाण्यांमुळे गाजतो तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील गाजतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी