Monday, July 1, 2024

कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप झाल्यानंतर हनी सिंगने केली पहिली पोस्ट; दिली महत्त्वाची माहिती

पंजाबी गायक हनी सिंगने अनेक सुपरहिट गाणे गायली आहेत. त्याला हे यश गाठण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत, पण त्याला त्या कष्टाचे फळ देखील मिळाले आहे. त्यानंतर त्याने शालिनी तलवारसोबत संसार थाटला होता. त्यांचा संसार सुरू असताना त्यांच्या सुखी संसारात आता वादळ आले आहे. हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. हा लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर हनी सिंगने पहिली पोस्ट शेअर केली आहे.

आता हनी सिंगने नवीन गाण्याबद्दल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. हनी सिंगने बुधवारी (२५ ऑगस्ट) रात्री केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, तो लवकरच ‘कांटा लगा’ नावाचे नवीन गाणे प्रदर्शित करणार आहे. (‘Kanta Laga’ is coming soon to meet the audience, posted by singer Honey Singh)

त्याचबरोबर हनी सिंगने हे देखील सांगितले आहे की, या गाण्यात टोनी कक्कर आणि नेहा कक्करदेखील असणार आहेत. हे गाणं टोनी कक्करने लिहिले आहे. त्याचबरोबर हनी सिंगने पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “वर्षातील सर्वात मोठा सहयोग. तयार व्हा. लवकरच येत आहे. हे गाणे देसी म्युझिक फॅक्टरी द्वारे रिलीज होईल. नेहा कक्कड आणि टोनी कक्कड देखील एकत्र असतील आणि आम्ही पार्टी कांटा लगा बनवणार आहोत.” अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

टोनीने लिहिलेे की, “तुझ्यासाठी खूप प्रेम आणि आदर पाजी.” हनी सिंगची ही पोस्ट २० दिवसांनंतर आली आहे.

अलीकडेच त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. याला उत्तर देताना हनी सिंगने हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, “अशा खोट्या आरोपांमुळे तो दु:खी आहे.”

हनी सिंग म्हणाला होता की, “शालिनी तलवारने केलेले आरोप मी नाकारतो आणि मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मला भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की, सत्य लवकरच बाहेर येईल. या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. न्यायालयाने मला माझे मत मांडण्यासाठी वेळ दिला आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की, कोणत्याही निर्णयावर उडी घेऊ नका. माझा विश्वास आहे की, न्याय होईल आणि मी जिंकेल.”

यापूर्वी हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने आरोप केला होता की, हनी सिंगने तिला शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रास दिला आहे.

दुसरीकडे या नवीन येणाऱ्या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर हे गाणं या पूर्वीच्या गाण्याप्रमाणेच सुपरहिट ठरेल का नाही, हे गाणं प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

हे देखील वाचा