Monday, July 8, 2024

साऊथ कॉमेडियन योगी बाबूवर विकी कौशलच्या चित्रपटाचे पोस्टर चोरी केल्याचा आरोप; नेटकरी करतायत ट्रोल

चित्रपटसृष्टीत खूप रोचक किस्से ऐकायला मिळतात. काही कलाकार एकमेकांची नक्कल करताना पाहायला मिळतात, तर काही कलाकार एकमेकांच्या स्टाईलची काॅपी करतात. त्यामुळे ते खूप चर्चेत येतात. तसेच चित्रपटाची कथा, संगीत, इंडस्ट्रीतील स्क्रिपट चोरी केल्याच्याही अनेक बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. बाॅलिवूडवर नेहमी हॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर चोरी केल्याचे आरोप कित्येकदा लादण्यात आले आहे. मात्र, यावेळी दक्षिण भारतीय चित्रपटावर पोस्टर काॅपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर चाहते प्रचंड ड्रोल करत आहेत.

विकी कौशलच्या चित्रपटाचे पोस्टर काॅपी?
बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा चित्रपट ‘भूत पार्ट वन: द हाँटेड शिप’ २०२०मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भानु प्रताप सिंग होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई नाही केली. परंतु या चित्रपटाचे पोस्टर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याच चित्रपटासारखा दुसरा चित्रपट अभिनेता योगी बाबूने बनवला आहे. त्याच्या चित्रपटाचे नाव ‘पेई मामा’ आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘पेई मामा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी एक विषेश पोस्टर शेअर केले आहे. मात्र, या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर पाहताच युजर्स संतापले आहेत. अनेकांना वाटत आहे की, विकी कौशलचा हिंदी चित्रपट ‘भूत’च्या पोस्टर सारखेच हे पोस्टर आहे. सोलश मीडिया या पोस्टरने प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर झाले पोस्टर ट्रोल
योगी बाबू भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तसेच तो तमिळ चित्रपटातील सुपरस्टार आहे. मात्र, त्याच्यावर विकी कौशल्यच्या चित्रपटाचे पोस्टर चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही पोस्टर पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत आहे की, फक्त कलाकार बदले आहेत. बाकी पोस्टर सेमच आहे, पण असे असूनही दोन्ही चित्रपटांचे पोस्टर लगेच ओळखू येत आहेत. त्यामुळे अनेक चाहते या पोस्टरवरून योगी बाबूला ट्रोल करत आहेत.

योगी बाबूच्या ‘पेई मामा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ति चिदंबरम यांनी केले आहे. या चित्रपटात एमएस भास्कर, कोवई सरला, वैयापुरी, रमेश खन्ना आणि अभिनेत्री रेखा प्रमुख भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा