कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी एक वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिकेची कहाणी सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची कहाणी दाखवली आहे. घरात कोणताही पुरुष नसताना ही मुलगी कॉलेज करता करता घराची जबाबदारी घेते. चार पैसे कमावता यावर म्हणून ती रिक्षा चालवते. खरंतर महिला आजकाल कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज त्या कार्यरत आहेत. याची एक झलक या मालिकेत दाखवली आहे.
मालिकेतील योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले मुख्य भूमिकेत आहेत. सौरभ हा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच त्या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या दोघांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला आहे. (Yogita chavhan aani saurabh chaugule’s dance video viral on social media)
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघे मालिकेतील त्यांच्या पात्रांच्या वेशभूषेत दिसत आहेत. ते एका डोंगरावर डान्स करताना दिसत आहे. तिथे खूप हवा येत असते, तरी देखील ते डान्स करत असतात. हा व्हिडिओ सौरभने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “रिलसाठी काय पण. आवडला का आमचा प्रयत्न?”
त्यांच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. मालिकेत मल्हार आणि अंतरा या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.
हेही वाचा :
‘आई कुठे काय करते’ मालिकेत लग्न सोहळा चाललाय दणक्यात, संगीताचे फोटो आले समोर
यावर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमांनी मिळवली तुफान लोकप्रियता
अनुष्कासोबत मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या वामिकाने केले विराटला चियर, फोटो झाला व्हायरल