Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तुम्हाला माहित आहे का शाहिद कपूरची बायको मीरा ‘या’ कलेत आहे पारंगत, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये असे अनेक जोडपे आहेत जे लोकप्रिय जोडपे म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर ही जोडपी नेहमी चर्चेत देखील असतात. या जोडप्यांची चाहत्यांमध्ये एक विशेष क्रेझ आहे. तर काही असे ही जोडपे आहेत ज्यांची पत्नी किंवा पती हे इंडस्ट्रीचा भाग नाहीत. मात्र तरीही त्यांची लोकप्रियता कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. यापैकी एक जोडपं म्हणजे शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत.

खरं तर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाही. मात्र तिची चर्चा ही कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मीरा कपूर वेळोवेळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तिच्या चाहत्यांसोबत आयुष्यातील क्षण शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच असाच एक खास क्षण मीरा राजपूतने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खरं तर मीराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पहिल्यानंतर चाहत्यांना समजले की ती एक उत्तम वादक आहे.

मीरा ही एक उत्तम पियानो वादक आहे. तिने पियानो वाजवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे यामध्ये मीरा पियानो वाजवत आहे आणि शाहिद कपूर शेजारी उभा राहून त्याचा आनंद घेत आहे. मीराने तिच्या पियानो वादनाचा शेवट शाहिद कपूरच्या चित्रपटातील कबीर सिंगच्या ‘बेखयाली’ या गाण्याने केला.

मीराने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये एक मोठी पोस्टही लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “तुम्हाला माहित आहे का की, मी पियानो देखील वाजवते. मी ट्रिनिटी ग्रेड ३ पर्यंत परीक्षा दिली आहे. मी ३ वर्षाची असल्यापासूनच कोणतेही गाणे ऐकून पियानोवर वाजवू शकते. मी विचार करत आहे की आता मी माझे धडे पुन्हा सुरू करावेत. हा एक सूर आहे जो मला आठवतो.”

तिने पुढे लिहिले की, “माझा पती तोपर्यंत वाट पाहत होता जोपर्यंत मी बेखयाली वाजवले नाही. मी पियानो वाजवू शकते. मात्र मी आता याचा सराव करत नाही. मी संगीत वाचून आणि ऐकून वाजवू शकते. मी पुन्हा पियानो वाजवण्याची वाट पाहू शकत नाही. आता जेव्हा मी पियानो पाहते, तेव्हा मी स्वतःला पियानो वाजवण्यापासून रोखू शकत नाही.”

मीरा राजपूतने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर चाहत्यांना देखील हा व्हिडिओ खूप आवडला आहे. इतकेच नव्हे तर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला. तर अनेक चाहत्यांनी तिच्या या कौशल्याचे खूप कौतुक केली.

 

 

 

हे देखील वाचा