Saturday, June 29, 2024

मुलांची ‘ऍक्शन’ पाहून तुम्ही सलमान खानची फायटिंग विसराल; व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

आजकाल सोशल मीडियाचे युग चालू आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो. वेगवेगळे फोटो किंवा व्हिडिओ दरदिवशी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. सध्याच्या काळात कोणता व्हिडिओ कधी आणि कसा व्हायरल होईल, हे सांगणे कठीण आहे. या सर्व गोष्टी सोशल मीडिया युजरच्या हातात असतात. त्यांना जे आवडते ते व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. अशामध्ये एक व्हिडिओ बराच चर्चेत आला आहे, ज्यामध्ये काही मुलं अभिनय करताना दिसत आहेत.

वास्तविक हा व्हिडिओ शिलेदार नावाच्या एका पेजने फेसबुकवर शेअर केला आहे. आपण पाहू शकतो की, यात मुलांची फाईट दाखवण्यात आली आहे. यातील मुलांनी केलेला उत्तम अभिनय आणि त्यांची दमदार ऍक्शन खरोखरच कौतुक करण्याजोगे आहे. फायटिंगचे सीन अतिशय योग्यरीत्या शूट करून सादर करण्यात आले आहेत. हे पाहून तुमही सलमान खानची फायटिंग विसराल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यातील मुलांनी अभिनयाच्या बाबतीत मोठमोठ्या ऍक्शन हिरोंनाही टक्कर दिली आहे, असेही म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

https://www.facebook.com/watch/?v=819921045609554

हा ऍक्शन व्हिडिओ आता फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणत आहेत की, हा व्हिडिओ सलमान खाननेही पाहायला हवा. आपल्या सर्वांना माहितच आहे की, सलमानला अभिनय व फायटिंगवरून बऱ्याचदा ट्रोल केले जाते. ऍक्शन फिल्ममधील त्याच्या ऍक्शन सीनची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते, हे तुम्हीही पाहिले असेल. अशामध्ये व्हिडिओमधील मुलांचा अभिनय पाहून, नेटकऱ्यांनी जणू काय भाईजानला टोमणेच मारले असल्याचे दिसते.

नुकताच आलेला सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’, हा चित्रपटही रिलीझ झाल्यापासून सतत चर्चेत येत आहे. ओटीटीवर रिलीझ झालेल्या या चित्रपटाला सलमानच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे, तर काहींना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, सलमान खानने आता असे स्टंट चित्रपट करू नये. प्रभूदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसली आहे. तसेच, रणदीप हुड्डा व ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफदेखील यात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा