अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं. ही बातमी ऐकून सगळेच हादरले. शेफालीने ‘कांटा लगा’ या गाण्यातून विशेष प्रसिद्धी मिळवली होती. तिच्या अकस्मात जाण्यामुळे चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. इतक्या कमी वयात तिचं निधन होणं हे अनेकांसाठी धक्कादायक ठरलं आहे. चला जाणून घेऊया, काेणते कलाकार कमी वयातच आपल्याल्या साेडून गेले.
शुक्रवारी रात्री अभिनेत्री आणि माॅडेल शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी आली, आणि ही बातमी ऐकून सगळेच थक्क झाले. फक्त 42 व्या वर्षी शेफालीनं जगाचा निराेप घेतला. सध्या मिळालेल्या माहितीनुसार तिला हार्ट अटॅक आला हाेता, पण तिच्या मृतयूचं नेमकं कारण पोस्टमार्टम रिपाेर्ट आल्यानंतरच कळणार आहे. शेफालीपूर्वीही काही कलाकार कमी वयात आपल्यातून निघून गेले आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या नावं.
स्मिता पाटिल
एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील एक नावाजलेली अभिनेत्री हाेति स्मिता पाटील. 70-80 च्या काळात त्या त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखल्या जायच्या. त्यांनी माेठमाेठ्या कलाकारांसाेबत काम केलं हाेतं. पण दुर्दैवाने मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे, त्यांचे पती राज बब्बर हेही एक प्रसिद्ध अभिनेते आहेत.
सिद्धार्थ शुक्ला
‘बिग बॉस 13’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अर्टकमुळे निधन झालं. त्याच्या जाण्याची बातमी ऐकून सदळेच हादरले हाेते.
संजीत बेदी
टीव्हीवरील प्रसिद्ध ‘संजीवनी- ए मेडिकल बून’ या मालिकेत डॉ. ओमीचं पात्र साकारणारे अभिनेता संजीत बेदी यांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली होती. पण दुर्दैवाने 2015 साली, वयाच्या फक्त 40 व्या वर्षी आजारामुळे त्यांचं निधन झालं.
मधुबाला
बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती मधुबाला. त्यांनी सिनेमात खूप छान काम केलं होओतं. पण दुर्दैवाने त्या खूप कमी वयातच आपल्याला सोडून गेल्या. फक्त 36 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
आरती अग्रवाल
अभिनेत्री आरती अग्रवाल या तेलुगू चित्रपटांमध्ये काम करुन प्रसिद्ध झाल्या हाेत्या. खूप कमी वयातच त्यांनी यश मिळवलं हाेतं. असं म्हणतात, की त्या बाॅलीवूडमध्ये येणाच्या तयारीत हाेत्या, पण त्याआधीच 2015 साली, वयाच्या फक्त 31 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शेफालीला घ्यायचे होते मूल दत्तक, कोरोनानंतर मनात भरली ही भीती










