अनुष्का शर्मा काही चित्रपटांनंतरच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बनली आणि अगदी कमी कालावधीतच तिला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. अभिनेत्रीने बॉलिवूडच्या सर्वोच्च कलाकारांसोबत काम केले आहे. आणि बऱ्याच हिट चित्रपटांचा ती एक भाग राहिली आहे. परंतू, स्टार बनण्यापूर्वी अनुष्का अनेक जाहिरातींमध्ये दिसली होती आणि जगातील एक प्रसिद्ध मॉडेलिंग व्यक्तीमत्व देखील होती.
या जाहिराती प्रसारित झाल्यानंतर, अनेक वर्षांनी आता तिच्या जाहिराती इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहेत. कॉस्मेटिक ब्रँड कमर्शियलपासून मोबाईल ब्रँड कमर्शियलपर्यंत अनुष्काने बऱ्याच जाहिरातीमध्ये काम केले आहे.
अनुष्का शर्मा अखेरच्या वेळेस ‘झिरो’ या चित्रपटामध्ये दिसली होती. ११ जानेवारीला ती आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली एका मुलीचे पालक झाले. विराट कोहलीने ट्विटरवर ही गोड बातमी दिली होती आणि सांगितले होते की, अनुष्का शर्मा आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत आणि कुटुंबाला थोडी प्रायव्हसी हवी आहे. सध्या अनुष्काने मुलगी वामिकासोबत वेळ घालवण्यासाठी कामापासून ब्रेक घेतला आहे.
विराट कोहलीने ट्विट केले होते की, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज दुपारी आमच्या आयुष्यात एका मुलीचा प्रवेश झाला आहे. तुमचे प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छा यासाठी आम्ही तुमच्या सर्वांचे आभार मानतो. अनुष्का आणि बाळ दोघेही निरोगी आहेत आणि त्यांच्या जीवनाचा हा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आम्हाला धन्य वाटत आहे. आम्ही आशा करतो की, यावेळी तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल.”
अनुष्का आता मुंबईच्या बाहेरील भागात पशू निवारा उघडण्याच्या विचारात आहे.
फिल्मफेअरनुसार एका जाणकार स्त्रोताने म्हटले आहे की, “जर सर्व काही योजनेनुसार चालले, तर अनुष्काचे शेल्टर पुढच्या वर्षी काम करण्यास तयार होईल. शेल्टरवर काम पुन्हा सुरू झाले आहे. कोरोनो विषाणूच्या आजारामुळे, सर्व कामे काही काळ पुढे ढकलली गेली होती. त्यांना प्राण्यांसाठी आधुनिक निवारा बांधायचा आहे, जो भारतात प्रथमच बांधला जात आहे आणि यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.”