Wednesday, June 26, 2024

सॅड सॉंग प्रेमींसाठी आलंय हीना खानचं नवं कोरं गाणं, पाहून अनेकांना आठवतंय पहिलं प्रेम

अभिनेत्री हिना खान आणि तन्मय सिंग यांचे जबरदस्त रोमँटिक गाणे ‘पत्थर वरगी’ नुकतेच रिलीझ केले गेले आहे. या गाण्यात हिना खान आणि तन्मय सिंगचा अतिशय रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे तरुणांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. रिलीझ होताच या गाण्याने वेगाने व्हायरल व्हायला सुरूवात केली आहे.

नुकतीच हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून गेली आहे. वडिलांच्या निधनानंतर हिनाचा म्युझिक व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे. या गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत, तर संगीत बी प्राक याचे आहे. हे गाणे रणवीरने गायले आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये, प्रेमात दुखावलेली हिना खान दारूच्या नशेमध्ये बुडालेली दिसत आहे. काही तासांपूर्वीच रिलीझ झालेल्या या गाण्याला ३४,७६,७०७ व्ह्यूज मिळाले आहेत.

नुकतेच अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर झालेली तिची मन: स्थिती उघड केली होती. जेव्हा तिच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा अभिनेत्री काश्मीरमध्ये होती. माध्यमांतील वृत्तानुसार हिना खान एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती, “मी बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. तुम्ही जितका याचा विचार करता, तुम्हाला तितका अधिक त्रास होतो. ” ती पुढे म्हणाली, “मला काहीही करू वाटत नाही किंवा कोणाशीही बोलू वाटत नाही. मला वेळ लागेल आणि मी तो वेळ घेईन. मात्र काही कामाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.”

हिना खानने आपल्या टीव्ही कारकिर्दीची सुरूवात एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ पासून केली होती. त्यात तिने अक्षरा माहेश्वरीची भूमिका साकारली होती, जी प्रचंड गाजली. यानंतर तिने बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तिने विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘हॅक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात आला होता.

हेही वाचा- 

वाढदिवशी विकी कौशलचा जुना व्हिडिओ व्हायरल; साऊथ इंडियन लूकमध्ये अभिनेत्याने केली मजेशीर ऍक्टिंग

ईदच्या दिवशी गौहर खानला आली वडिलांची आठवण, वडिलांचा फोटो शेअर करून लिहिली भावुक पोस्ट

महाविद्यालयाचा प्राध्यापक करत होता अश्लील मॅसेज; गायिकेने थेट सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत शिकवला धडा!

हे देखील वाचा