प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ‘घाघरा’! ‘देसी क्वीन’ सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा पुन्हा एकदा देशभरात जलवा

youtube sapna choudhary new haryanvi song ghaghara out video viral on social media


प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तिची जादू केवळ हरियाणापुरतीच मर्यादित नाही तर, देशभरातून तिला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. सपना चौधरीच्या डान्सचे व्हिडिओ तर धमाल करतच असतात, मात्र आता तिचे गाणेही सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. तिचे चाहते नेहमी तिच्या नवीन गाण्यांची आतुरतेने वाट पाहतात. अलीकडेच सपना चौधरीने तिच्या ‘घाघरा’ या नवीन गाण्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती, जे आता रिलीझ झाले आहे.

सपना चौधरीचे नवीन गाणे रिलीझ होताच, सर्वत्र धमाल करत आहे. हे गाणे रिलीझ झाल्यानंतर, काही तासांतच याला १ लाख २६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे सपना चौधरीच्या या गाण्याला, हरियाणवी गायिका रुचिका जांगिड़ यांनी आवाज दिला आहे, जे सपना चौधरीवर चित्रित करण्यात आले आहे. नेहमी प्रमाणेच हे गाणेे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यापूर्वी सपना चौधरीचे ‘घुंघरू’ गाणे रिलीझ झाले होते, जे तूफान व्हायरल झाले होते.

या दिवसात एका पाठोपाठ एक अशी सपना चौधरीची बरीच गाणी रिलीझ होत आहेत. आता आलेल्या ‘घागरा’ मध्ये तिची पूर्णपणे नवीन स्टाईल पाहायला मिळत आहे. हरियाणवी ड्रेसमध्ये तिचे देसी मूव्हज आणि एक्सप्रेशन्स चांगलेच पसंत केले जात आहेत.

आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर हे गाणे शेअर करत, सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “घागरा आला आहे. या गाण्यावर स्वत: चे रील्स बनवा.” सपनाची जादूच अशी आहे, की तिच्या डान्समुळे ती केवळ हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम यूपीच नव्हे तर संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.