Tuesday, July 9, 2024

भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबवर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

सैनिकांचे आपल्या जीवनातील महत्त्व पाहता, त्यांच्याबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित बरेच गाणेही नेहमी येत असतात. काही चित्रपटांच्या माध्यमातून येतात तर काही अल्बम यु युट्यूबवर रिलीज होतात. सैनिकांच्या जीवनातील दुःख, वेदना, त्यांची जिद्द, देशाला वाचवण्याचे साहस दाखविणाऱ्या या गाण्यांना प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळते.

नुकतेच, दिग्दर्शक शादाब सिद्दीकी आणि गायक पलक मुच्छल यांचे ‘तुम बिन’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. आतापर्यंत या गाण्याला यूट्यूबवर 2 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तर 20 हजाराहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओवर हजारो कमेंट्स करत लोकांनी या गाण्याचे जोरदार कौतुकही केले आहे.

या गाण्यात अभिषेक निगम आणि रीम शेख मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक निगमने यात एका सैनिकाची भूमिका साकारली आहे, ज्याला लग्नाच्या पहिल्या रात्रीच सीमेवर परत जावे लागते.

रीम शेख पती गेल्यानंतर त्याची वाट पाहत बसते. तिच्या अस्वस्थपणावर हे गाणे आहे. रीमला सतत पती आल्याचा भास होतो, त्यासाठी ती दरवाजाच्यापाशी अनेक फेऱ्या मारते. मग एक दिवस असे काहीतरी घडते, जे पाहून रीमला धक्का बसतो. आता पुढे काय होईल यासाठी आपल्याला हे गाणे पाहावे लागेल. तसेच, हे गाणे परफेक्ट टाइम पिक्चरद्वारे रिलीज करण्यात आले आहे.

गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर हे गाणे पलक मुच्छल हिने गायले आहे आणि शादाब सिद्दीकीने यांनी दिग्दर्शन केले आहे. सुभाशिनी स्वर जलालाबादीने गीत लिहिले आहे. त्याचप्रमाणे, गाण्याचे संगीत नितेश रामचंद्र यांनी दिले असून संवाद अराफत मेहमूद यांनी लिहिला आहे. या हृदयस्पर्शी गाण्याचे निर्माता कुमार अभिषेक आहेत.

दिग्दर्शक शादाब सिद्दीकी यांनी यापूर्वी टी सीरिज प्रॉडक्शनचे ‘पल पल’ हे सुपरहिट गाणे दिग्दर्शित केले होते. ज्याला 70 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात अभिनेता एजाज खानने अभिनय केला आहे. 2016 मध्ये ‘लव्ह इन स्लम’ मध्ये लघुपट बनवून दिग्दर्शकाची भूमिका साकारणाऱ्या शादाब सिद्दीकीची 2017 मध्ये चर्चा रंगली, जेव्हा त्यांनी ‘ह्वेयर इज नजीब’ ही दुसरी शॉर्ट फिल्म बनविली होती. आता त्यांचे ‘तुम बिन’ हे नवीन गाणे बंगाली थीमवर असून ते जगासमोर आले आहे.

हे देखील वाचा