हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींमध्ये आवर्जुन नाव घेतले जाते, ते म्हणजे साठच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे. शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी सन 1969 मध्ये लग्न केले होते. त्यांची प्रेम कहाणी चांगलीच गाजली. शर्मिला आणि मन्सूर यांना तीन मुले आहेत. सैफ अली खान जो बॉलिवूड अभिनेता आहे, तर सबा अली खान एक ज्वेलरी डिझाइनर आहे आणि सोहा अली खान एक अभिनेत्री आहे. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली यांची प्रेम कहाणी खूपच रंजक आहे. आज या लेखात आपण त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत.
मन्सूर अली खान पतौडी यांनी पहिल्याच भेटीत शर्मिला टागोर यांचे मन जिंकले होते. शर्मिला आणि मन्सूर यांची कहाणी अगदी परीकथेसारखीच आहे. 1965मध्ये शर्मिला या पटौदींना आपल्या एका मित्राच्या पार्टीत भेटल्या होत्या. त्यावेळी शर्मिला या एक मोठ्या अभिनेत्री होत्या, आणि प्रसिद्ध मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच टायगर पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. ऑक्सफोर्ड पदवीधर टायगर यांची सगळीकडे हवा होती. त्यांची पाश्चात्य शैली आणि ब्रिटिश उच्चारण ही एक वेगळी ओळख बनवत असत.
नुकत्याच यूट्यूबवर दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी जुने दिवस आठवत सांगितले की, मी स्वतःच्या विनोदावर हसायचे, जो इतर कोणालाही समजत नसायचा. शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नाविषयीही खुलासा केला आहे. टायगर पतौडी यांच्या सकारात्मक सवयींबद्दल बोलताना शर्मिला म्हणाल्या की, “मला त्यांचा हजरजबाबीपणा खूप आवडायचा, आणि मला असे वाटले की, ही व्यक्ती मला जाणूनबुजून कधीही दुखावणार नाही.”
शर्मिला टागोर यांनी मुलाखती दरम्यान एक मजेदार घटनेबद्दल सांगितले. त्यांनी पतौडींच्या खराब अभिनयाबद्दल काही बोलले आहे का? असे विचारले असता, त्यांनी एक मजेदार गोष्ट सांगितली. शर्मिला म्हणाल्या की, “एकदा मन्सूर अली यांच्याकडून झेल सुटल्यानंतर माझ्या वडिलांनी मला ओरडले की, ‘तुम्ही त्यांना रात्रभर जागवून नव्हते ठेवायला नव्हते पाहिजे.'”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ एका कारणासाठी अभिनेते धर्मेंद्र चुकवायचे सीन, शोले चित्रपटातला रंजक किस्सा ऐकून व्हाल थक्क
शॉकिंग! ब्लॉकबस्टर ‘केजीएफ’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, कलाविश्वावर दु:खाचा डोंगर