Friday, July 5, 2024

ब्रेकिंग! प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू, 300 किमी प्रतितास वेगाने चालवत होता बाईक

प्रसिद्ध यूटुबर असणाऱ्या २२ वर्षीय अगस्त्य चौहानचा अपघातात मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर त्याला लाखो लोकं फॉलो करत होते. दिल्लीच्या यमुना एक्सप्रेस हायवेवर रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या एक दिवस आधीच त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. तोच त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले होते की, तो देहराडूनहून दिल्लीसाठी निघाला आहे. देखील पोहचल्यावर तो त्याला त्याच्या बहिणीने दिलेले गिफ्ट उघडणार होता. मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. अगस्त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या फॉलोवर्समध्ये दुःखाचे वातावरण असून , ते सर्वच सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

अगस्त्याने त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, “मित्रांनो माझी बहीण लंडनहून आली आहे. ती माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली, मात्र २० दिवसांपासून ते तसेच पडले आहे. मी अनबॉक्स केले नाही. आता दिल्लीला जाऊन उघडेल.” अगस्त्यचे ‘प्रो रायडर 1000’ नावाचे चॅनेल आहे. ज्याचे लाखो सब्स्क्राबर आहेत.

अगस्त्यचे वडील पहलवान असून, त्यांनी अनेक मेडल जिंकले आहेत. मुलीला प्रदेशात पाठवण्यासाठी ते दिल्लीला जात होते. तेव्हाच रस्त्यात त्यांना मुलाच्या अपघाताची वाईट बातमी मिळाली. अगस्त्याच्या मृत्यूमुळे त्याचे आईवडील आणि बहिणीचे रडून रडून वाईट हाल झाले आहेत.

दिल्लीमध्ये यूटुबर्सच्या बैठकीआधी अगस्त्य त्याच्या चार बाईक रायडर्स मित्रांसोबत यमुना एक्सप्रेस वेवर रायडिंगसाठी निघाले होते, त्यातच त्याची बाईक अनियंत्रित झाली आणि बजेट डिव्हायडेरवर आदळून त्याचा अपघात झाला. या ट्क्करमुळे त्याचे हेल्मेट निघाले आणि चेहऱ्याला मार बसला. जागीच त्याचा मृत्यू झाला. बाईकच्या नंबर वरून दिल्ली पोलीस्नी उत्तराखंड पोलिसाना संपर्क केला आणि त्यांनी अगस्त्याच्या घरच्यांना याबद्दल सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध संगीत कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्यावर मंदिरातून बाहेर येताच झाडल्या होत्या १६ गोळ्या, वाचा त्यांची कहाणी

एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास गमावून बसला होता “हा” विनोदी अभिनेता

हे देखील वाचा