भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सध्या खूपच चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहते. काही दिवसांपूर्वी चहलचे आई- वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे धनश्रीने इंस्टाग्रामपासून थोडे दिवस अंतर राखले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवर पुनरागमन केले आहे. आपल्या जबरदस्त डान्स मुव्हजसाठी ओळखली जाणारी धनश्री पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. जे पाहून चाहते तिचे दीवाने होत आहेत.
धनश्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने निळ्या रंगाची पँट आणि शर्ट घातला आहे. या कपड्यांमध्ये तिने जबरदस्त डान्स केला आहे.
धनश्रीने हा डान्स व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या अशांत वातावरणात ट्रेंड कायम ठेवा. तसे उद्या याच ट्रॅकवर एक डान्स रील पोस्ट करेल, परंतु एका विनोदी अंदाजात. कोणी अंदाज लावेल का? काय होणार आहे?”
धनश्रीच्या या डान्स व्हिडिओला नेहमीप्रमाणेच चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टवर ते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “हिच्या मुव्हज इतक्या वेगवान असतात की, समजतच नाही काय करत आहे.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “वाह भाभीजी वाह.”
विशेष म्हणजे सन २०१४ मध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजमधून शिक्षण घेणाऱ्या धनश्री वर्माचा डान्सशी निगडीत स्वत: चा एक यूट्यूब चॅनेलही आहे. या चॅनेलला तब्बल १५ लाखांपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलचे लग्न मागील वर्षी म्हणजेच सन २०२० मध्ये झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










