Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड जाकिर खानने कॉमेडीपासून घेतला दीर्घ ब्रेक; शोच्या मंचावर केला धक्कादायक खुलासा, या दिवशी होऊ शकतो शेवटचा शो

जाकिर खानने कॉमेडीपासून घेतला दीर्घ ब्रेक; शोच्या मंचावर केला धक्कादायक खुलासा, या दिवशी होऊ शकतो शेवटचा शो

लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन जाकिर खानने कॉमेडीपासून दीर्घ काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या त्यांच्या ‘पापा यार’ टूरमधील लाईव्ह शोदरम्यान झाकिरने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. शोमधील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खचाखच भरलेल्या ऑडिटोरियममध्ये भावूक होत झाकिर (Zakir)म्हणाला की हा ब्रेक तीन ते पाच वर्षांचा असू शकतो. सध्याच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्यानंतर तो 2028, 2029 किंवा 2030 पर्यंत स्टेजपासून दूर राहू शकतो. यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. झाकिर खानने सांगितले, “हा ब्रेक मी माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि आयुष्यातील काही गोष्टी सुलभ करण्यासाठी घेत आहे. आज इथे उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक माझ्या खूप जवळचा आहे. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी कल्पनेपलीकडचा आहे. मी तुमचा कायम ऋणी आहे.”

शो संपल्यानंतर जाकिर खानने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत ब्रेककडे इशारा केला. बुर्ज खलिफाचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, “20 जूनपर्यंतचा प्रत्येक शो एक उत्सव आहे. यावेळी अनेक शहरांत येता येणार नाही, त्यामुळे शक्य असेल तर थोडा अधिक प्रयत्न करून शोला या. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.” यामुळे 20 जून हा त्याचा शेवटचा परफॉर्मन्स असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

झाकिर यापूर्वीही सततच्या टूरिंगमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी बोलला होता. 2025 मधील एका पोस्टमध्ये त्याने सांगितले होते की गेल्या दहा वर्षांपासून तो सतत टूर करत आहे. दिवसाला दोन-तीन शो, अपुरी झोप, सकाळच्या फ्लाइट्स आणि अनियमित जेवण याचा त्याच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला आहे. तो गेल्या एक वर्षापासून आजारी असल्याचेही त्याने उघड केले होते. जाकिर खानच्या या घोषणेमुळे त्याचे चाहते सोशल मीडियावर नाराजी आणि काळजी व्यक्त करत असून, त्याच्या लवकर पुनरागमनाची आशा व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

‘अहानने कमेंट केला तर…’ बॉर्डर 2 रिलीजआधी के.एल. राहुलची मेहुण्याकडे खास मागणी; सासऱ्यांना हसू आवरेना

हे देखील वाचा