झरीन खान हि एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तर ती सध्या तिच्या वैयक्तिक दुःखात प्रसंगामुळे सध्या चर्चेत आहे. या अभिनेत्रीची आई बऱ्याच काळापासून आजारी होती आणि उपचार घेत होती मात्र या आजारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 8 एप्रिल 2026 रोजी परविन खान यांचे निधन झाले. ही बातमी कळताच सोशल मीडियावर सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. ही दुःखद बातमी झरीन खानच्या टीमने जारी केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे निश्चित करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे.
टीमने शेअर केलेल्या संदेशात म्हटले आहे, आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, झरीन खान यांच्या प्रिय आई परवीन खान यांचे 8 एप्रिल रोजी निधन झाले. कुटुंबाने त्यांच्या अंत्यविधीबद्दलही माहिती दिली असून, 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार केले जातील असे सांगितले आहे. तर झरीन खान हिला ‘वीर’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली आहे. तर या मध्ये ती सलमान खानची नायिका होती. त्या काळात हा चित्रपट गाजला आणि त्यातिल गाणि सुद्धा प्रचंड गाजली होती तर आज प्रेक्षक आवडीने हि गाणी ऐकतात.
झरीन (Zaraeen)तिच्या आईची खुप लाडकी होती. तर या कठीण काळात ती सतत तिची काळजी घेत होती. काही दिवसांपूर्वीच, तिने तिच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली होती. तर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी सदिच्छा व्यक्त केली होती. सोशल मीडियावर ही बातमी आल्यानंतर, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी झरीन आणि तिच्या कुटुंबाप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
उत्तर रामायणतील बालकलाकारांचा प्रवास, एक सात समुद्रापार, तर दुसरा आहे सुपरस्टार










